सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार

. . 1 "ह्युस्टन, वुई हॅव अ प्रॉब्लेम.." नासाच्या ह्युस्टन येथील नियंत्रण कक्षात मिळालेला हा संदेश पृथ्वीपासून दोन लाख पाच हजार मैल दूर पोहोचलेल्या, मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या नासाच्या तिसर्‍या मोहिमेतील अपोलो-१३ या चांद्रयानातून आला होता.

सुपरस्पाय

सुपरस्पाय-बोका ए आझम “ त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅकॉर्थर; दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख. “ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटीश गुप्तचर संघटना एम.आय.६ मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरीत्या घुसवलेला दुहेरी हेर. “ हेरगिरीच्या इतिहासातला सर्वात जबरदस्त हेर” – ईअन फ्लेमिंग; जेम्स बाँडचा जनक. “त्याच्या हेरगिरीने जगाला वाचवलं.” – लान्स मॉरो; जगद्विख्यात इतिहासकार आणि स्तंभलेखक. “त्याने इतिहास घडवला पण आपण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.” – कार्ल बर्नस्टाईन; जग

रातराणी : [कथा] : कळते रे!

वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनाऱ्यावर बसून शंखशिंपले असं काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो. ती शांतपणे गोळा केलेल्या शंखशिंपल्यांच्या दोन वाटण्या करते. एक हिस्सा मला देते आणि म्हणते, "हे घे. हे तुझ्यासाठी. " "मला कशाला, मला नको हे मुलींचे खेळ. ठेव तुलाच." असं मी म्हणतो आणि स्वप्नातून जागा होतो.
Subscribe to दिवाळी अंक २०१५