या महानगरीत राहायला आल्यापासून कामावरून घरी परतायला मी उपनगरी मेट्रो रेल्वेचा वापर करतो. माझे शिक्षण आणि नोकरीचा बहुतेक सर्व वेळ मध्यम आकाराच्या शहरात व्यतीत झाला आहे. त्यामुळे या महानगरीतल्या संस्थेच्या मुख्यालयामध्ये अचानक झालेली बदली स्वीकारावी की नाही, यावर घरात बराच खल झाला होता.
तुझ्या रूपाचं चांदणं
पोरी जपून ठेवावं
आणि नक्षत्राचं दान
त्यात ओतून ठेवावं //१//
असं टिपूर पडलं
तुझ्या रूपाचं चांदणं
तुला कसं गं सुचलं
माझ्या नावाचं गोंदणं //२//
तुझ्या रूपाचं चांदणं
माझ्य
वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनार्यावर बसून शंखशिंपले असं काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो.
त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅक'आर्थर; दुसर्या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख. “ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटिश गुप्तचर संघटना एम.आय.६मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरित्या घुसवलेला दुहेरी हेर.
सामान्य गोवेकर तसा उत्सवप्रिय. गोव्यातली हिंदू जनता आपल्या एका आगळ्यावेगळ्या 'गोंयकारपणाने' वर्षभर अनेक सण साजरे करते. ह्या सणवारांमध्ये स्थानिक जत्रा, पालखी उत्सवसुद्धा समाविष्ट आहेत, जे शतकानुशतकं साजरे केले जातात. देवाचे उत्सव साजरे करणं आणि त्यात सहपरिवार भाग घेणं हे इथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
आम्ही पुन्हा रोथेनबुर्गला चाललो आहोत, हे ऐकून त्सेंटाआजी जरा वैतागलीच. "अगं, रोथेनबुर्ग सुंदरच आहे, पण सारखं काय तिथेच जाता? अजून थोडंसं, ५० कि.मी. पुढे जा की डिंकेल्सब्युलला. कितीदा सांगायचं? तेही किती सुरेख आहे. आमच्या वालरष्टाईनच्या शाळेतून तिथे सहल न्यायचे.
मी अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात राहतो. दर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी सकाळी न चुकता आमच्या घराशेजारील गार्डन-कम-वॉकिंग स्ट्रीपवर चालायला जातो. पूर्वी हे एक गोल्फ कोर्स होते, जे पुढे बागेमध्ये परिवर्तित केले गेले. ह्या बागेच्या अगदी मधोमध एक तलाव आहे. त्याच्या आसपास शेड्स बांधल्या आहेत आणि त्या शेड्सच्या खाली लोकांना बसायला टेबल्स आणि बेंचेस लावली आहेत.
“डोळे फुटले का तुमचे? तिथे बोर्ड लावला आहे तो दिसत नाही? तोच तोच प्रश्न विचारता.. साठ रुपये राइस प्लेट, ऐंशी रुपये फुल थाळी.”
“काय गुरुजी, आंधळे असल्यासारखे काय चालताय? रांगोळी मिटली ना तुमच्या पायाने.”
“तुमची भाषा कशी - करून राहिला आहे.. एका वाक्यात तीन क्रियापदे? व्याकरणाची पार वाट लावली तुम्ही.”
“ए, ऐकू येत नाही का तुला? त्यांना पोळी हवी, पाणी नाही.”
“आधी माझे ऐकून घ्या.
तीन–साडेतीन झाले असतील नसतील. मनोजने पानपट्टी उघडून थोडाच वेळ झाला होता. लक्झरी बसस्टॅंडवरचं उघडणारं पहिलं दुकान त्याचंच. मनोज आतलं सामान जागेवरच लावत होता, तोच त्याला दुरूनच ऑटोचा ‘टरटर’ आवाज आला. संतोषभाऊचा ऑटो, त्याने बरोबर ओळखलं.
संतोषने मनोजच्या पानपट्टीपाशी ऑटो थांबवला. इंजीन बंद करून एकदाची ती ‘टरटर’ थांबवली.
सानिकाची शाळेची तयारी चालू होती. सानिकाच्या आईला, म्हणजेच नेत्रालाही बॅंकेत वेळेवर पोहोचायचं होतं. आज बॅंकेत पूजा होती. "हेअर बॅंड लावलास का सानिका?" नेत्रा पर्समधला छोटा आरसा काढत ओरडली. एकीकडे नेत्रा आपले केस विंचरत होती. "हो आई, तूच तर लावलास." सानिका खोलीत येत म्हणाली. "एवढी वेणी घातलीय आज, पण फूल नाहीये माळायला. जाऊ दे, आता कोण बघतंय!