ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे.. !

. . हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता.

खीरकदम

. . माताय, मिपावर एवढे रथीमहारथी असताना लिहायचं म्हटलं की प्रश्न पडतो. कविता लिहावी, तर अजूनपर्यंत कधी ठरवून लिहू म्हटलं आणि लिहिली असं झालं नाही. लेख? तो सुचेना. मग म्हटलं, आता होम पीचवर उतरावं. बरं, त्यातही व्याप कमी नाहीत. मिपाचा मुदपाकखाना सुगरणी आणि बल्लवाचार्यांनी परिपूर्ण! सणासुदीची म्हटल्यावर रेशिपी थोडी हटकेही पाह्यजे ना राव!!

मन एकात, दुसर्‍यात

. . मूळ गीत: मन तळ्यात मळ्यात, मन एकात.. दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात. मन गुंफियते धागा, अन गुंतत जाई सार्‍यात. मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात. उरी हिथचा वसे आठव, चित्त जॉनीच्या खळयांत. मन एकात दुसर्‍यात.. कधी कुणा तिसर्‍यात. इथे स्टीव्हचे स्मरण करते, अन बिलचेही घर मनात. मन एकात दुसर्‍यात..

ओल्या नारळाचे लाडू

. . साहित्य : १) ओल्या नारळाचा कीस - ३ वाट्या २) पिठीसाखर - २ वाट्या ३) मनुका - हव्या तितक्या ४) मिल्क पावडर - २ चमचे (ऐच्छिक) ५) दूध - १ वाटी ६) मलई - ३ मोठे चमचे (ऐच्छिक) कृती :- नॉनस्टिक पॅनमध्ये १ वाटी दूध घालून त्यात नारळाचा कीस घालून मंद आचेवर परतत राहायचा. दूध आटत आलं की त्यात मलई घालायची. त्यामुळे नारळाचा कीस नरम पडतो.

काजू/खजूर रोल

. . रामराम मंडळी, सर्वप्रथम सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा :) दिवाळी सण मोठा नाही रेसिपींना तोटा :) नेहमीच्याच खमंग फराळासोबत हे रोल नक्की करून पाहा.

बेळ्ळी

. . जोळी डंगर्‍या बैलाची झालं कचूमचू गाळं वाटं उतरेलं चाकं असे जिंदगी चे हालं जो येते तो बोलूनचं निर्‍हा गामनं ठेवते होनं जानं काई नाई फक्त चकोन्या दाखोते कायं कोनाच्या पोटातं नाई होटावरं दिसे जातो भरळल्या आमी दाने जात्यातले जसे कई फुटीलं भोपया निंगतीलं ह्या झापळा भिता सारोल्या जातीलं कई खचूनं पोपळा आमी बापा साधे सुधे नाई समजतं कावा नोका चितं पाऊ आता बेळ्ळी लागली रे बावा

हॅपी अवर्स

. . मुंबईतली एक नेहमीचीच सकाळ उजाडते. खरे तर तिची ही दुसरी सकाळ असते. पहिली तो फिरायचा पोशाख चढवून उतरतो ती आणि ही दुसरी. तिची सकाळ. आळस झटकत रेडिओ बंद करत ती उठतॆ. तो खाली फिरायला गेलेला असतो, एव्हाना तो वर यायची वेळ झालेली असते. आवरून आटपून ती बाहेर येते, मोबाईल चार्जरला लावते. दुधाची पिशवी आत आणते, चहा टाकते. तिच्याबरोबर तिचा रेडिओपण स्वयंपाकघरात येतो. तो येतो.

विठ्ठल : शामल गरुड

. . माझी गंजली मुळाक्षरं साऱ्या उतान्याच ओळी पाय दुमडून बसले पाषाण देहात दडुनी कोण ठोकतं दार खुट्टा उघडेना माझा नाभी मध्ये गुत्थी आई सोडीना नाळ कानी आले अफाट चढला सादळल्या भिंतीवर मोडला रेड्याचा पाय कच्च्या जानव्याचं दोर कसं ओढलं धूड दात घुसले जीभाडात कण्ह कण्हत बसला मनचंद्या कुठल्या भोकातून वेद पडला बाहेर माझ्या अंगणात जत्था चोख्या तुक्याचा गजर जनी सोवळीच उभी कोरे घेऊन अभंग सारे

थोडी सागरनिळाई.. थोडे शंख नि शिंपले...!!

. . सेशल्समध्ये पहिल्यांदाच कार चालवणार्‍यासाठी बरेच लोक बर्‍याच सूचना देतात. शंभर वर्षं जगलेला मनुष्य जसा आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य म्हणून दही, दोरीच्या उड्या किंवा ब्रह्मचर्य यांपैकी काहीही सर्टिफाय करू शकतो, तसं सेशल्समधे राहत असल्याच्या अनुभवावर कोणतीही सूचना ही एकदम कमांडमेंट ठरते. पण पण पण..

आमचीही एक 'स्वारीची तयारी'… चंद्रावर!!

. . (या लेखातल्या नावाशी किंवा घटनेशी तुमचं कोणतंही साधर्म्य असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे ढिशक्लेमर उपचारापुरतंच… त्यातूनही काही तुमच्या जवळपास जाणारं सापडलं, तर तुम्हाला देवच तारो अशी सदिच्छा!!) मुंबईत एकवेळ देव सापडेल, पण मनासारखं घर सापडणं महाकठीण!! रोजच्या वृत्तपत्रातल्या घरासंदर्भातल्या पानपानभर चकचकीत जाहिराती पाहून कोणालाही भुरळ न पडली तरच नवल बरं का….
Subscribe to दिवाळी अंक २०१५