केळी जास्त पिकलेली असली कि खाविशी वाटत नाहित. अश्यावेळी उरलेल्या केळ्यांचा हा झटपट होणारा बनाना नट ब्रेड अतिशय चविष्ट होतो.
साहित्य : ४ पिकलेली केळी,
१/२ कप वितळवलेल बटर,
१ १/२ कप मैदा ,
२ फेटलेली अंडी,
३/४ कप बारीक वाटलेली साखर,
१ टिस्पुन बेकिंग सोडा,
१ टिस्पुन वनिला,
१ चिमुट मीठ
१/४ कप बरीक कापलेले अक्रोड,
मुठभर मनुका
केळी कुस्करुन घ्यावीत. एका भांड्यात केळी आणि बटर मिसळावे. त्यात फेटलेली अंडी, वनिला घालुन एकत्र करावे.
नंतर मीठ, साखर, बेकिंग पावडर सगळे घालून १ मिनिट फेटावे. त्यात मैदा घालावा. चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात
अक्रोड आणि मनुका घालाव्यात.
अवन ३५० फारनहाईट वर गरम करुन घ्यावा. बेक करायच्या भांड्याला बटर लावुन त्यात वरील मिश्रण ओतावे.
१ तास बेक करावे. गरमागरम बनाना-नट ब्रेड तयार.
वाचने
5400
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
लवंगीताई,
नक्की करुन पहा
In reply to लवंगीताई, by रेवती
झक्कास!!!!! -
मस्त
व्वा.असा
चालेल का?
अंड्याशीवाय कधी करुन नाहि पाहिला
In reply to चालेल का? by सोनम
मस्त..
मस्तच
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
मस्त