Skip to main content

मेथी चिकन

लेखक गणपा यांनी रविवार, 01/03/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज रविवार कोंबडीचा दिवस ;) नेहमीच ते कोंबडीच सुक नी कोंबडी रस्सा खाउन मित्र कंटाळले होते 8} . म्हणाले गण्या आज काही तरी बदल कर गड्या .(विप्रंचा लेख वाचला वाटत लेकांनी , ह्यांना पण बदल हवा.) ( आणि हे गड्या मित्रा या अर्थी म्हणाले कि रामागडी म्हणुन ते देव जाणे. ) फ्रिज उघडला. काय काय कच्चा माल आहे घरात पाहील. कालच इथे मेथी मिळालीहोती. आयते ३-४ गिनीपिग हाती लगलेले. म्हट्ल करु नविन प्रयोग. (गड्या काय :W ) फटाफट मित्रांना फर्मानं सोडली. एकाला २ टोमॅटो, २ कांदे बारिक कापायला लावल. दुसर्‍याला एक जुडी मेथी धुवुन चिरायला बसवल. तिसर्‍याला कोंबडी साफ करायला लावल. आल लसुणाची पेस्ट हाती होतीच. सर्व साहित्य हाती येताच मी सुत्र हाती घेतली. B) प्रयोग चालु केला. कोंबडीला मीठ, हळद, आल लसुण पेस्ट, थोडा मसाला लावुन १/२ तास फ्रिज मध्ये मुरत ठेवल. एका भांड्यात २ डाव तेल गरम केलं. तेल कडकडीत तापल्या वर त्यात चिरलेला कांदा गुलाबी होइस्तव परतुन घेतला. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकुन परत २ मिनिट परतुन घेतल. त्यात १ चमचा मसाला टाकुन चांगला परतुन घेतला. जेव्हा तेल बाजुने सुटु लागल तेव्हा त्यात मेथी टाकली. चवी नुसार मीठ टाकल. भांड झाकुन १ दणदणीत वाफ आणली. नंतर त्यात मुरवलेली कोंबडी टाकली . नीट परतवुन परत १०-१५ मीनीट आच मध्यम करुन ठेवली. पण हाय रे दैवा मित्रांच्या नशीबाने मेथी कडु निघाली. #o हातशी नारळ होताच. लगेच १/२ नारळ वाटुन त्याच दुध झालेल्या पदार्थात टाकल. झक्कास उकळी आणली. पण हे सगळ इतक निरागस ;;) पणे केल की मित्रांना वाटल कि हा प्रकार माझ्या पाककृती चाच एक भाग आहे. तर मंडळी पेश ए खिजमत है..... ढँट्या SSSS ढ्यँ.. :P सध्या सगळे मित्र यथेच्छ कोंबडी ओरपुन आडवे झालेत I) I). जगले वाचले तर त्यांच्या प्रतिक्रिया कळतीलच. तोवर तुम्ही करुन पहा आणि मला जरुर कळवा.

वाचने 7583
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

गोष्ट धमाल गणपाची!;) काय कराल तुम्ही सांगता येत नाही. मित्र तर झोपलेत ना...पण तुम्हाला कशी वाटली ही नवनिर्मीती? रेवती

In reply to by गणपा

हुश्श! सगळे ठणठणीत बरे आहेत. पदार्थ चांगला झाला होता. बरे वाटले वाचून....... काय आहे ना उगीच काळजी वाटली. रेवती

फोटो तरी चांगला दिसतो आहे. :) तुम्ही सुद्धा तुमच्या स्वयंपाक घराला प्रयोग शाळा बनवलंत तर!! (चला कोणीतरी माझ्या पंक्तीत आला) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

साधारण शंभर माणसं होती तात्याच्या अंतयात्रेला.. मेथी चिकन खाऊन त्याने सुखासमाधानाने डोळे मिटले असं एका बाईने सांगितलं. ही बाई त्याची आवडती स्त्री होती असं समजतं! :) धन्यवाद..

In reply to by विसोबा खेचर

=))

In reply to by विसोबा खेचर

तात्यानू वैकुंठधामाचा पत्ता कळवा ;) तुमच्यासाठी पेश्शल डबा रोज पाठवू. -आपला गण्या.

In reply to by विसोबा खेचर

च्यायला तात्या, तुझ्या मृत्यूपत्राची वाटच बघत होतो.... =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

सही आहे .. फोटोही जिवघेणा दिसतोय! माझा नवरा असंच कोथिंबीर चिकन करतो! काय लागतं तेही!! :) http://bhagyashreee.blogspot.com/

मेथी टाकली. चवी नुसार मीठ टाकल. भांड झाकुन १ दणदणीत वाफ आणली. अहो भाउ मेथीवर झाकण ठेवल की ती कडुच होणार..... पण हाय रे दैवा मित्रांच्या नशीबाने मेथी कडु निघाली. मेथीला नका नाव ठेवु ती बिचारी कडुच असते....... पुढच्यावेळेला झाकण ठेवु नका....मेथी शिजेपर्यंत. मग नाही लागणार चवीला मेथी कडु. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by स्नेहश्री

स्नेहश्री तै, अहो भाउ मेथीवर झाकण ठेवल की ती कडुच होणार..... ह्ये माहितच न्हवत व. टीप्स बद्दल लै आभरी हाये. फुडच्या टायमाला ध्यानात ठेउ.

पालेभाजी आणि चिकन्/मटण हे कॉम्बिनेशन तसं जबराच. तसे पालक घालूनही चंगलच बनतं पण मेथीची जी एक अंगभूत कडवट चव असते, त्याची मजा काही औरच! फोटो तर सहीच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

खरय रे सुनील, मागे एकदा पालक घालुन पण कोंबडी केली होती. एकदम फंडु झाली होती. पण तेव्हा फोटो काढले न्हवते...

गणपा मेथी चिकन करतात हो. कसुरी मेथी पण घालतात चिकन मध्ये छान होते मेथी चिकन. तुम्ही नाही झोपलात का चिकन खाउन ?

हल्ली आमच्या गणपाच्या कीबोर्डावर फार धुळ जमली आहे असे आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून समजते. असो. बदलीन....