नमस्कार मंडळी, आज रविवार कोंबडीचा दिवस ;)
नेहमीच ते कोंबडीच सुक नी कोंबडी रस्सा खाउन मित्र कंटाळले होते 8} .
म्हणाले गण्या आज काही तरी बदल कर गड्या .(विप्रंचा लेख वाचला वाटत लेकांनी , ह्यांना पण बदल हवा.)
( आणि हे गड्या मित्रा या अर्थी म्हणाले कि रामागडी म्हणुन ते देव जाणे. )
फ्रिज उघडला. काय काय कच्चा माल आहे घरात पाहील. कालच इथे मेथी मिळालीहोती.
आयते ३-४ गिनीपिग हाती लगलेले. म्हट्ल करु नविन प्रयोग. (गड्या काय :W )
फटाफट मित्रांना फर्मानं सोडली.
एकाला २ टोमॅटो, २ कांदे बारिक कापायला लावल.
दुसर्याला एक जुडी मेथी धुवुन चिरायला बसवल.
तिसर्याला कोंबडी साफ करायला लावल.
आल लसुणाची पेस्ट हाती होतीच. सर्व साहित्य हाती येताच मी सुत्र हाती घेतली. B) प्रयोग चालु केला.
कोंबडीला मीठ, हळद, आल लसुण पेस्ट, थोडा मसाला लावुन १/२ तास फ्रिज मध्ये मुरत ठेवल.
एका भांड्यात २ डाव तेल गरम केलं. तेल कडकडीत तापल्या वर त्यात चिरलेला कांदा गुलाबी होइस्तव परतुन घेतला. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकुन परत २ मिनिट परतुन घेतल. त्यात १ चमचा मसाला टाकुन चांगला परतुन घेतला. जेव्हा तेल बाजुने सुटु लागल तेव्हा त्यात मेथी टाकली. चवी नुसार मीठ टाकल. भांड झाकुन १ दणदणीत वाफ आणली.
नंतर त्यात मुरवलेली कोंबडी टाकली . नीट परतवुन परत १०-१५ मीनीट आच मध्यम करुन ठेवली.
पण हाय रे दैवा मित्रांच्या नशीबाने मेथी कडु निघाली. #o हातशी नारळ होताच.
लगेच १/२ नारळ वाटुन त्याच दुध झालेल्या पदार्थात टाकल. झक्कास उकळी आणली.
पण हे सगळ इतक निरागस ;;) पणे केल की मित्रांना वाटल कि हा प्रकार माझ्या पाककृती चाच एक भाग आहे.
तर मंडळी पेश ए खिजमत है..... ढँट्या SSSS ढ्यँ.. :P
सध्या सगळे मित्र यथेच्छ कोंबडी ओरपुन आडवे झालेत I) I).
जगले वाचले तर त्यांच्या प्रतिक्रिया कळतीलच.
तोवर तुम्ही करुन पहा आणि मला जरुर कळवा.

वाचने
7583
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोष्ट धमाल
कसच कसच.
In reply to गोष्ट धमाल by रेवती
हुश्श! सगळे
In reply to कसच कसच. by गणपा
धन्य आहात..
गुरुमाउली
In reply to धन्य आहात.. by प्राजु
वेगळीच आहे रे हि रेसिपी
जिवंत हैत.
In reply to वेगळीच आहे रे हि रेसिपी by लवंगी
साधारण
:)
In reply to साधारण by विसोबा खेचर
तात्यानू
In reply to साधारण by विसोबा खेचर
च्यायला
In reply to साधारण by विसोबा खेचर
सही आहे ..
कडु
धन्यु
In reply to कडु by स्नेहश्री
सही
खरय रे
In reply to सही by सुनील
मेथी
हल्ली आमच्या गणपाच्या