Skip to main content

भरले tomato

भरले tomato

Published on बुधवार, 28/01/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य :- १. ४/५ छोटे tomato २. अर्धी वाटी ओल खोबर, ४ /५ लसूण पाकळ्या,अर्धा चमचा आल, १/२ हिरव्या मिरच्या व कोथिम्बीर एकत्रीत वाटून ३. १ चमचा गरम मसाला ४. १चमचा धने-जिरे पावडर ५. १ चमचा लाल तिखट ६. १ कान्दा बारिक चिरुन ७. अर्धा चमचा साखर ८.४/५ कढिपत्त्याची पाने ९. फोडणीसाठि - तेल, मोहरी, जिर, हिन्ग, हळद १०. मीठ चविनुसार १. tomato च्या देठाकडील भाग थोडासा कापून tomatoतिल गर काढून घ्यावा. २. खोबर,लसूण, आल, मिरचि व कोथिम्बीरीच्या वाटणात गरम मसाला, धने-जिरे पावडर , लाल तिखट, चमचा साखर व मिठ घालून एकत्रीत करावे. ३. गर काढलेल्या tomato मधे वरिल मिश्रण भरावे. ४. कढईत तेल गरम करून फोडणी करावी ५. त्यात कढिपत्त्याची पाने,बारिक चिरुलेला कान्दा घालून परतावे. ६. कान्दा गूलाबी झाल्यावर त्यात उरलेले वाटण घालून परतावे . ७. मिश्रणाला तेल सुटल्यावर भरलेले tomato व थोडेसे पाणी घालुन पून्हा परतावे व झाकण ठेउन एक वाफ आणावी. ८. tomato शिजल्यावर गॅस बन्द करावा. ९. कोथिम्बीर पेरून सर्व करावे.

याद्या 5207
प्रतिक्रिया 12

वाह ! तोंडापाणी सुटले ! * कोथिम्बीर पेरून सर्व करावे. हे कळाले नाही.... बस्स ! इकडे कोथिम्बीर जमीनीत पेरतात त्यामुळे.... कळाले नसेल ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.

In reply to by दशानन

इकडे कोथिम्बीर जमीनीत पेरतात जमिनीत पेरतात ते धने. जमिनीवर उगवते ती कोथिंबिर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

ओह ! असं काय :? स्वारी शक्तीमान माहीत नव्हतं ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.

In reply to by दशानन

पाकृ छान आहे. भरले टोमॅटो छान लागतात. मूळ लेखात 'कोथिंबीर पेरून सर्व करावे' यातले 'सर्व = सगळं' असे वाटल्याने. पदार्थ बनवतानाच कोथिंबीर पेरावी असे वाटून माझा गोंधळ झाला. पण सर्व हे इंग्रजी क्रियापद 'वाढणे' या साठी वापरले आहे हे कळताच गोंधळ दूर झाला. राजे, पदार्थावर वरुन जे भुरभुरवतात त्याला पेरणे असेही म्हणतात. उदा. पीठ पेरुन भाजी करणे. 'पेराल ते उगवेल' या धर्तीवर 'पेराल ते चव वाढवेल' असा वाक्प्रचार तयार करता येईल :) -- लिखाळ.

पाकृ वाचून तोंडाला पाणी सुटले. आजच करून पाहतो.

आबारी हाय मानसी तै मी रवीवारी करुन बगतो. पीकलेली tomato , कच्ची वांगी आनी सिमला मीर्ची सोबत मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

आवडली पाकृ! नक्की करून बघीन व कळवीन. रेवती

छान आहे पाकृ. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आम्ही पाकृ न वाचताच हा प्रतिसाद देत आहोत. आम्ही बिगरफोटोच्या पाकृ वाचतदेखील नाही! फक्त स्वाती राजेश यांच्यासारखे काही अपवाद, जी मिपाच्या सुरवातीपासूनच खूप छान पाकृ देत आहे! तात्या.

अय्या, छानच आहे! मी करून पाहीन या वीकांताला!! पण छोट्या टोमॅटोमध्ये खोबर्‍याचा मसाला भरण्याऐवजी जर मोठ्या टोमॅटोमध्ये शिजवलेला खिमा भरला तर? मला वाटतं मग तात्यांनाही आवडेल अशी डिश!! -स्वाती डांबिश

In reply to by पिवळा डांबिस

ज ब रा =)) ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.