हे एक छानस डाएट फुड आहे. त्यात तुम्ही तुम्हाला हवीतशी व्हेरिएशन्स करु शकता.
खर तर आत्ता भाज्या छान असतात त्यामुळे मस्त मजा येते करायला पण आणि खायलापण.
साहित्यः-
३ वाट्या कॉर्नचे दाणे वाफवुन
३ वाट्या मोड आलेले मुग वाफवुन
३ कांदे बारिक चिरुन
लाल,पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची प्रत्येकी १ बारिक चिरुन
३ गाजर किसुन
३ टोमॅटो बारिक चिरुन
१-१+/२ कोथिंबीर बारिक चिरुन
१ वाटी हिरवी चटणी ( पुदिना+कोथिंबीर+लसुण+आल+लिंबु+मिठ+मिरची)
१+१/२ चमचा जिरे खमंग भाजुन+१ चमचा काळ मीठ एकत्र करुन घ्यावे
१+१/२ चमचा पाणीपुरी मसाला.
डेकोरेशन साठी: चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला, डाळींबाचे दाणे ,आणि बटाटाची लाल सळी( "डाएट फुड" लोकाना नको.)
वरिल सर्व साहित्य आयत्यावेळेस एकत्र करुन त्यावर चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला,डाळींबाचे दाणे , आणि बटाटाची लाल सळी घालुन खायला द्यावे.
वाचने
8820
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोर्न भेल
बटाटाची लाल सळई
सळी ...........
वा!
:)
In reply to वा! by रेवती
टार्या, तू पण
In reply to :) by टारझन
सह्ही.
चिंगु चटणी म्हणजे काय?
हाहाहा..
In reply to चिंगु चटणी म्हणजे काय? by बहुगुणी
चटपटीत
मस्तच
.