साहित्य:-
- एक मोठा लसणाचा गड्डा
- अर्धी वाटी शेंगदाणे
- एक वाटी सुक्या लाल मिरच्या किंवा लाल तिखट
- सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
- दोन चमचे जाड पोहे
- दोन टेबलस्पून पंढरपुरी डाळं (फुटाण्याची डाळ)
- दोन टेबलस्पून बेसन पीठ
- एक चमचा जिरे
- दोन चमचे धने
- एक चमचा साखर
- ५-६ पुदिन्याची पाने (आवडत आसल्यास)
- पाव वाटी तेल
- चवीनुसार मीठ
- कोथिंबीर (आवडत आसल्यास)
कृती:-
- सोललेल्या लसूणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, पोहे, पंढरपुरी डाळं, मीठ आणि लाल मिरच्या (मिरच्यांऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल), जिरे, धने, साखर, मीठ, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटावं.
- अर्धवट वाटून झाल्यावर त्यात डाळीचं पीठ घालून परत जाडसर होईपर्यंत फिरवून घ्यावे.
- गॅसवर एका कढाईत तेल तापत ठेवावं.
- तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कुटलेली चटणी घालावी.
- मंद आचेवर दहा-बारा मिनिटं परतावं. खमंग भाजावं.
- गार झाल्यावर चटणी बरणीत भरावी.
- ही चटणी बरेच दिवस टिकते. प्रवासातही उपयोगी पडते.
- ह्या चटणी बरोबर ज्वारीची, तांदळाची, बाजरीची भाकरी एकदम झक्कास लागते. व सोबत हाताने फोडलेला कांदा घ्यावा.
टिप्स:-
- लाल मिरच्या किंवा लाल तिखट आपल्या आवडीनुसार व तिखटाच्या प्रमाणावर टाकावे.
- लाल मिरच्या किंवा लाल तिखट याऐवजी हिरव्या मिरच्यांचा वापर सुध्दा करु शकता.
- हि चटणी झणझणीतच चांगली लागते.
- कृपया चटणी करताना यात पाणी आजिबात वापरु नये. कारण पाणी घातल्यावर हि चटणी आणखीणच तिखट लागते.
- चटणीवर ज्यांना तेल आवडत आसेल त्यांनी तेल टाकुन हि चटणी खावी टेस्ट एकदम वेगळीच लागते.
वाचने
5635
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा.. करणारच..एक्दम तोंपासु
भारी
स्वारी स्वारी
In reply to भारी by चाणक्य
सॉरी
ह्हाह्हाआआआआआआ.....!