Skip to main content

झणझणीत... तिखट... तोंडाला पाणी आणेल... अशी "झटका चटणी"

लेखक कैवल्यसिंह यांनी गुरुवार, 03/11/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- - एक मोठा लसणाचा गड्डा - अर्धी वाटी शेंगदाणे - एक वाटी सुक्या लाल मिरच्या किंवा लाल तिखट - सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी - दोन चमचे जाड पोहे - दोन टेबलस्पून पंढरपुरी डाळं (फुटाण्याची डाळ) - दोन टेबलस्पून बेसन पीठ - एक चमचा जिरे - दोन चमचे धने - एक चमचा साखर - ५-६ पुदिन्याची पाने (आवडत आसल्यास) - पाव वाटी तेल - चवीनुसार मीठ - कोथिंबीर (आवडत आसल्यास) कृती:- - सोललेल्या लसूणाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे, पोहे, पंढरपुरी डाळं, मीठ आणि लाल मिरच्या (मिरच्यांऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल), जिरे, धने, साखर, मीठ, पुदिन्याची पाने, कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटावं. - अर्धवट वाटून झाल्यावर त्यात डाळीचं पीठ घालून परत जाडसर होईपर्यंत फिरवून घ्यावे. - गॅसवर एका कढाईत तेल तापत ठेवावं. - तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कुटलेली चटणी घालावी. - मंद आचेवर दहा-बारा मिनिटं परतावं. खमंग भाजावं. - गार झाल्यावर चटणी बरणीत भरावी. - ही चटणी बरेच दिवस टिकते. प्रवासातही उपयोगी पडते. - ह्या चटणी बरोबर ज्वारीची, तांदळाची, बाजरीची भाकरी एकदम झक्कास लागते. व सोबत हाताने फोडलेला कांदा घ्यावा. टिप्स:- - लाल मिरच्या किंवा लाल तिखट आपल्या आवडीनुसार व तिखटाच्या प्रमाणावर टाकावे. - लाल मिरच्या किंवा लाल तिखट याऐवजी हिरव्या मिरच्यांचा वापर सुध्दा करु शकता. - हि चटणी झणझणीतच चांगली लागते. - कृपया चटणी करताना यात पाणी आजिबात वापरु नये. कारण पाणी घातल्यावर हि चटणी आणखीणच तिखट लागते. - चटणीवर ज्यांना तेल आवडत आसेल त्यांनी तेल टाकुन हि चटणी खावी टेस्ट एकदम वेगळीच लागते.

वाचने 5635
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पण फटु ? फटु कुठाय ? ज्याच्या पाकृचा फटु नाय, त्याचा काय बी नाय.

हा खुपच जुना फोटो आहे. जेव्हा लाल मिरच्या घालुन ही चटणी केली तेव्हा ती संपुन गेली व फोटो काढायचा राहीला.. त्यामुळे आधी हिच चटणी हिरव्या मिरच्या व कोथिंबीर व पुदिना पाने टाकुन केली होती त्याचा फोटो टाकलाय.... sorry navin photo nantar taken mi...