Skip to main content

चिकनची खेकडा भजी

लेखक केडी यांनी मंगळवार, 25/10/2016 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
Onion Chicken Pakodas साहित्य ६०० ग्रॅम चिकन लेगपीस, स्किन सकट १ गड्डी लसूण, सोलून, बारीक चिरून १ इंच आलं, बारीक चिरून २ ते ३ हिरव्या मिरच्यां, बरीक चिरून २ कांदे, पातळ उभे चिरून १ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर १ चमचा हळद १ चमचा गरम मसाला १/२ चमचा ओवा १/२ वाटी बेसन ३ मोठे चमचे कॉर्नफ्लार १ १/२ चमचा मीठ तळायला तेल कृती चिकन धुवुन कोरडे करून घ्या. मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा. आलं, लसूण बारीक आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कांदे पातळ उभे चिरून घ्या. कांद्याला, सगळे मसाले (लाल मिरची पावडर, हळद, बिर्याणी मसाला/गरम मसाला), ओवा, आलं, लसूण, हिरवी मिर्ची आणि १ चमचा मीठ लावून बाजूला ठेवा. Step1 Step2Step3 Step4Step5 चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या. Step6 Step7 चिकन कांद्याच्या मिश्रणात टाकून, ते निट मळून घ्या. ह्यात आता ३ चमचे कॉर्नफ्लॉर, आणि लागेल तसं बेसन घालून, मिश्रण भज्यांच्या पीठ सारखे करून घ्या. चव बघून लागल्यास मीठ घाला. Step8 Step9 कढईत तेल गरम करून, भज्या थापून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम चिकन खेकडा भजी तळून मीठ लावलेल्या मिरच्या सोबत खायला घ्या! STep10 Step11Step12 [चिकन लेगपीस ओव्हन मध्ये नं भाजता, प्रेशर कुकर मध्ये सुद्धा एक शिट्टी देऊन शिजवून घेऊ शकता. मी कोथिंबीर घालायचं विसरलो, ती सुद्धा बारीक चिरून घालू शकता. मिश्रण नीट मिळून येण्यासाठी, थोडं पाणी घातलं तरी चालेल, मला लागला नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं, तेवढा पुरेसा आहे. तळताना फार वेळ तळावे लागत नाही, तुम्ही कांदा जितका पातळ चिराल तेवढ्या पटकन ह्या भज्या शिजतील, कांदा, लसूण, मिरच्या आणि आलं चिरायला मी मांडोलीन/स्लाईसर वापरला]. Onion Chicken Pakodas

वाचने 15776
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

एक नंबर ! कांद्याची भजी आणि फ्राईड चिकन दोन्हीही आवडतात, त्यामुळे हा प्रयोग एक नंबर असल्याबद्दल शंकाच नाही !

In reply to by ज्योति केंजळे

चिकन नीट शिजवले / तळले तर त्यातले व्हायरस मरून निकामी होतात :)

भारीच ............
चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या.
चिकन कशाने किसले ? एअर फ्रायर वर भारी होतील ना ही भजी ? नुसती भजी खाऊन उपयोग नाही सोबत दुसरे ही काही लागेल .

In reply to by रॉजरमूर

चिकन कशाने किसले ?
चिकन स्किन सकट कमी तापमानाला ऑन-दि-बोन शिजवल्यामुळे अतिशय मऊसूद शिजते. गार झाल्यावर हाताने श्रेड करता येते.

सगळ्या बिचाऱ्या मिपासदस्यांवर इमोसनल अत्याचार झालेला पाहुन ड्वाले पानावले ..

केवळ क्लास... पुन्हा एकदा कल्पकतेला सलाम. रेसेपी आणि चित्रे खास. _/\_ याबरोबर मिरची-पुदीन्याची चटणी मस्त जोड देईल.

मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा.
ओव्हन मोडमधे मायक्रोवेव्ह.. ओटीजी चालेल का?

मस्त आहेत फोटोज. बाय द वे , मी airfryer मध्ये बाकरवडी केली, १ चमचा तेलात, मस्त झाली नक्की तरी करून बघा के डी !