Skip to main content

अंड्याचा पुलाव

लेखक जागु
Published on शुक्रवार, 08/07/2016
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते. बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे. साहित्यः ६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन) दोन वाट्या तांदुळ दोन कांदे चिरुन अर्धा वाटी दही २ चमचे आल-लसुण पेस्ट १ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट फोडणीसाठी तेल चविनुसार मिठ कोरडा मसाला: १ चमचा जिर १ चमचा धणे दालचिनी १ ते २ तुकडे ३ वेलच्या ४-५ लवंग पाककृती : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते. बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे. कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा) त्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना?) आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा. आता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून . आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?) जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा. झाला आहे तयार अंड्याचा पुलाव. थोडा अजुन जवळून प्राजक्ता म्हात्रे कृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी. अधिक टिपा: घाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त. हाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो. रेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच. :हाहा:

वाचन संख्या 19995
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

ते बैदा रोटी वाले भाऊ अन इकडे जागु ताई काय सुट्टी देईनात जिभेला लाळ गाळण्यात ओव्हरटाईम करायला लागतोय तो वेगळाच त्रास

मोदक, गणामास्तर, धनंजय मोने, सोन्याबापू, अनिरुद्ध धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल.

In reply to by संजय पाटिल

ब्रोब्र आहे. अंडा बिर्याणी खाल्ल्यावर विश्वास सरपोतदार म्हटलं तरी काय फरक पडतो म्हणा. आय माय स्वारी पातेलं. ;) ते बॉण्ड, जेम्स बॉण्ड च्या चालीत बसलं म्हणून बोललो. बाकी धनंजय माने आणि बॉण्ड चा लांब लांब पर्यन्त संबंध नाही याबाबत निश्शंक आहोत. जागुतै, पाकृ वर अवांतर केल्याबद्दल क्षमस्व.

काय रंग आहे!!! आहाहा!! भात वेगळा शिजवुन मग मसाल्यात मिक्स केला तर अंडी सुद्धा जास्त शिजणार नाहीत ना?

In reply to by पिलीयन रायडर

कालच करुन खाण्यात आलेला आहे मी तर टोचे मारायला विसरलो होतो म्हटला शिट्टी घेताना फुटतील तर खीर होईल पण तसे झाले नाही. जागुतै भारी होता गं !

आजच करणार! धन्यवाद जागुताई!

जबराट!!!
(हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)
रंग अगदी झणझणीत आला आहे. हा नविन मसाला तुम्ही मसाल्याची रेसिपी दिल्याप्रमाणेच बनवला आहे कि वेगळा?

In reply to by बोका-ए-आझम

मग! तुम्हाला काय वाटलं? देवमाणुस एकदम. अतिशय सात्त्विक, निरागस, सालस, राजबिंडं व्यक्तिमत्व. बघा कुणी असलं तर.... ;) (हानतंय अभ्या मला)

In reply to by बोका-ए-आझम

*फेसपाम* अभ्या शाकाहारी असल्यास 'मेरुने मुंगी पर्वत गिळला काय' असे विचारावे लागेल!, बोकडे आनंदात उड्या मारू लागतील अन जागतिक कोंबडी लोकसंख्या एकदम 10 टक्के वाढेल! @माने, तुम्ही म्हणे कोंबड्या परत चापणे सुरु केलेत?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शंतनु च्या बायकोला सुधाला तर ना.... कोण कोण मित्र बनवलेत कुणास ठाऊक. तिकडे सांगत आली का? अहो त्या दिवशी पार्वतीने थोडं झनझनित बनवलं आमच्या सोन्याबापुच्या पाकृ प्रमाणे. खाल्ला रस्सा आणि आवडला. मग लेगपीस घेतला मग दुसरा आणि असं करत कढाई चं काम च झालं. (नंतर दोन दिवस आड्या जोशाच्या पाचव्या खोलीच्या आसपास होतो ते वेगळं) तर असा सगळा प्रकार झाला. विश्वास सरपोतदार बंगल्याभोवती सगळी सुवासिक फुलझाडं लावत बसलेत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अधून मधून असल्या चाव्या माराव्या लागतेय. मिपाकर लै बारीक नजरेचे हे सिद्ध होतंय. आमच्याकडे तर आजकाल लै जणांचं बारीक लक्ष असतंय. कुठं बॉम्ब बिंब घेऊन फिरल्यागत. :(

पण यात अंड्याऐवजी पनीर वापरता नाही येणार...मस्त लागत असणार.

पुलाव बनवून पाहिला, थोडा पुदिनाही घातला होता, मस्त झाला.

In reply to by धनंजय माने

पुलाव बनवून पाहिला, थोडा पुदिनाही घातला होता, मस्त झाला. पुरवून पुरवून दुसऱ्या दिवशीही खाल्ला, तेव्हा जास्त छान लागला. अंड्याशिवाय तर अजून जास्त छान लागला, आणि काय बरं...

पुलाव लय भारी! करुन पाहिला. चांगला झाला होता. अंडी टोचण्याचा प्रकार जमला नाही.

सगळ्यांचे धन्यवाद. जर अंडी वातड होत आहेत असे वाटत असेल तर उकडलेली अंडी मसाल्यावर थोडी फ्राय करून पुलाव झाल्यानंतर मिक्स केले तरी चालेल.

शिंगाळ्यांच्या अंड्यांचा पुलाव होऊ शकेल काय???