इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . .
हापिसात जात नसलेला वेळ . . आणि आत्ताच खाल्लेल्या तंदुरी चिकन आणि बिर्याणीने पोट भरल्यामुळे कैच्या काय चालणारं डोकं . . याचा हा परिणाम
तर . . मंडळी . .
बाभळीच्या काट्यांची उसळ :-
साहित्य :-
१५० - २०० बाभळीचे काटे . . कमीत कमी ३ - ४ इंच लांबीचे (आता हे कुठून मिळवायचे हे तुमचं तुम्ही बघा )
२ वाट्या दही . . जितकं आंबट असेल तितकं चांगलं . .
२ - ३ दिवस खाण्याच्या कपाटात दह्याचं भांडं उघडं ठेवलं कि होईल आंबट . . ( खाण्याचं कपाट काय हे समजलं नसेल तर जवळपास च्या "वाड्यात" राहणाऱ्या लोकांना विचारा . . सांगतील ते )
३-४ कांदे . . लहान असतील तर ५-६ घ्या .
पाव किलो शेंगाचा कूट ( काट्यात भरण्यासाठी . )
गरम मसाले . तिखट , ३-४ चमचे (हे आपापल्या तिखट खाण्याच्या क्याप्याशिटी वर अवलंबून )
मीठ चवीनुसार .
कृती :-
काटे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत . गरम असेल तर चांगलं .
काटे धुवून झाले कि ते उन्हात वाळू द्यावेत थोडे .
इकडून तिकडून उडून आलेली वाळू त्यांना लागू नये म्हणून वरून पण पातळ कापड ठेवलं तरी चालेल . (कापडाच्या चारी कोपऱ्यावर काही तरी जड ठेवायचं विसरू नका . . )
काटे वाळले . कि नाजूक हाताने त्यात उभे काप द्यावेत .
आता साहित्यात असलेल्या शेंगाच्या कुटात थोडं तीखट मीठ घालावं .
त्याची छान चटणी केलीत तरी चालेल .
आता उभ्या चिरलेल्या काट्यात आडव्या हाताने ती चटणी / तिखट मीठ लावलेलं कूट भरावं .
आता . जसे भरलेले /किंवा वरून बेसन लावलेले म्हणा, बांगडे गरम तेलात सोडतात (शाकाहारी लोकांनी या जागी कांदा भजी वाचली तरी चालेल) तसे ते उकळत्या तेलात सोडावेत .
थोड्या वेळाने . काट्यांचा वरचा काळसर रंग अजून काळा होऊ लागेल .
मग ते बाहेर काढावेत .
आता . हे सगळं बाजूला ठेऊन .
उरलेल्या कुटात थोडं पाणी मिसळून . गरजेनुसार मसाला , तिखट , मीठ , जिरे , काळी मिरची . तीळ , हिंग , हळद , दालचिनी , वेलदोडे , कडलिंब , इत्यादी साहित्य घालून मस्त ग्रेवी करावी .
आता हे सगळं मिश्रण गरम करायला ठेऊन . त्यात ते तळलेले काटे सोडावेत .
तयारी झाला बाभळीच्या काट्यांची उसळ .
सोबतीला आंबोळी / भाकरी / चपाती / पोळी / पुरी / पिज्झा बेस . जे आवडेल ते घेऊ शकता .
आता प्रश्न तो .
दही आणि कांद्याचं काय करायचं हा .
तर हे सगळं वाचून ज्यांची डोकी गरम होतील त्यांनी दही डोक्यावर थापून घ्यावं .
आणि ज्यांना भोवळ येईल त्यांच्या आजूबाजूच्यांनी कांदा त्यांच्या म्हणजेच भोवळ आलेल्यांच्या नाकाशी धरावा
वाचने
11618
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही पाकक्रुकी अंडे घालुन
पाकक्रुकी म्हणजे काय
In reply to ही पाकक्रुकी अंडे घालुन by जेपी
The पाक which is crooked can
In reply to पाकक्रुकी म्हणजे काय by बॅटमॅन
सोम्मार असुन पण टायपो झाला..
In reply to पाकक्रुकी म्हणजे काय by बॅटमॅन
हा पाक क्रुकी नको ? असं
In reply to पाकक्रुकी म्हणजे काय by बॅटमॅन
प्रत्येक अंड्यात चार काटे ,
तोंडात काटे आले...
रेसिपी की थंडीमुळे माहीत नाही
पण काटा आला...
In reply to रेसिपी की थंडीमुळे माहीत नाही by सूड
ओके पण कुठे?
In reply to पण काटा आला... by दिपक.कुवेत
बाभळीच्या काट्याची उसळ
आउटपुट पोर्टस बरेच तयार
In reply to बाभळीच्या काट्याची उसळ by जातवेद
अरारारारारा =))
In reply to आउटपुट पोर्टस बरेच तयार by अद्द्या
टारु आणि मी केलेले मसाला
(No subject)
कोणा ना कोणाचा तरी .
In reply to (No subject) by स्पा
काय प्रगत टेक्नॉलॉजी आहे.
In reply to कोणा ना कोणाचा तरी . by अद्द्या
मी मेल वर ज्यांना हि पाकृ
In reply to कोणा ना कोणाचा तरी . by अद्द्या
फोटो?
एक सूचना
बाभळींच्या काट्यांची उसळ.
हेच आठवले होते
In reply to बाभळींच्या काट्यांची उसळ. by हरकाम्या
ही पाकृ
काटे बाभळीचे की अंगातले !!!
मूळ वाक्प्रचार >>>>>
In reply to काटे बाभळीचे की अंगातले !!! by चिपळूणकर
=))
In reply to मूळ वाक्प्रचार >>>>> by यसवायजी