अंडा भुर्जी
साहित्य
३ अंडे
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेला टोमाटो
३-४ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे कांदा लसून मसाला
१ छोटा चमचा तिखट
१ चमचा जिरे
हिंग व मीठ चवीनुसार
कृती
प्रथम एका नॉन स्टिक कढई मध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात जिरे व हिंग टाकावे
जीरे तडतडल्यानंतर चिरलेला कांदा टाकावा
नंतर वाटलेल्या मिरच्यांचा खुडा, कांदा लसूण मसाला व तिखट टाकावे.
फेटलेली अंडी टाकावी.
गॅस मोठा करून मिश्रण घोटवावे. नंतर चिरलेला टोमाटो टाकून crusher ने एकजीव करून घ्यावे.
Crusher चा फायदा असा की भुर्जी मध्ये मोठे तुकडे राहत नाही आणी बारीक, एकजीव भुर्जी तयार होते.
कोथींबीर टाकून सजवावी व ब्रेड या पावाबरोबर खावी. सोबत कांदा आणी टोमतोचे मिश्रण सर्व करावे.
Thumps up बरोबर आस्वाद घ्यावा.
वाचन
14344
प्रतिक्रिया
32