पिझ्झा
सुट्टीच्या दिवशी तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर एकदम मस्त आणि फक्त ३०-३५ मिनिटात होणारा हा pan पिझ्झा.
साहित्य :
पिझ्झा बेस (बेकरीत २५ रुपयाला ३ पिझ्झा बेस मिळतात )
२ पिझ्झा साठी ३ चीज कुब्स (जास्त चीज हवे असेल तर जास्त चीज कुब्स आणावेत)
पिझ्झा सॉस (कुठल्याही मॉल मध्ये किवा किराणा मालाच्या दुकानात सुधा मिळतो. )
लाल तिखट
मीठ
पातळ उभा चिरलेला कांदा , टोमाटो , ढोबळी मिरची
थोडसं तूप किवा बटर
ओरिगानो , चिली flex (हवेच असं काही नाही. नसले तरी चालतात. )
प्रथम चीज चे covers काढून फ्रीज मध्ये ठेवावेत . कारण पिझ्झा गरम असतानाच चीज घालायचं असता. नंतर कवर काढत बसलं तर तिकडे पिझ्झा गार होवून जातो .
कृती :
१. एका पसरत ताटात पिझ्झा बेस घ्यावा. वरचा भाग चमच्याने खरवडून काढावा. त्यावर ३-४ चमचे पिझ्झा सॉस पसरवून घ्यावा.
२. आता ह्याच्यावर उभा , पातळ चिरलेला कांदा, टोमाटो , ढोबळी मिरची पसरवून टाकावी . वरून लाल तिखट आणि मीठ हवा असेल तेवढा भुरभुरवा
३. आता बाजूचा चुरा पुन्हा त्याच्यावर पसरवा. आणि हाताने थोडा दाब द्यावा.
४. तवा गरम करून त्यावर तूप किवा बटर पसरवावे . त्यावर हा पिझ्झा घालावा. मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजून द्यावा. आच मंदच ठेवावी नाहीतर त्याचा जळल मेलं लक्षण होतं .
५. उलथन्याने उलथून दुसर्या बाजूने ३ मिनिटे भाजावा.
६. आता ताटामध्ये उतरवून पटकन चीज किसून घालावे. आणि हाताने थोडा दाब द्यावा म्हणजे चीज पिझ्झ्यावर बरोबर बसेल.
झाला पिझ्झा. आता ह्याचे ४ किवा ६ भाग करावेत आणि खावेत.
वाचन
13797
प्रतिक्रिया
0