तांदळाची उकड
साहित्यः
१ वाटी तांदुळ पिठी
१ वाटी आंबट ताक
१ वाटी पाणी
२-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
२-३ लसूण पाकळ्या ठेचून
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
कढीपत्ता
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा.
त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या.
आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढा.
उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात तांदळाची पिठी घाला, नीट एकत्र करुन वाफ काढा.
गरम उकड साजूक तूप व कोथींबीर घालून सर्व्ह करा.
आवडत असल्यास फोडणीत हळद घाला.
साजूक तूपाऐवजी कच्च तेल घालून ही उकड खाता येते.
गरम उकड साजूक तूप व कोथींबीर घालून सर्व्ह करा.
वाचने
13385
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आहा! काय प्रेझेन्टेशन आहे.
In reply to आहा! काय प्रेझेन्टेशन आहे. by कवितानागेश
लीमाउजेट+++++११११११
In reply to आहा! काय प्रेझेन्टेशन आहे. by कवितानागेश
+ १
आई ग्ग! भन्नाट दिसते आहे!
ekadum bhari!
ए दिल है मुश्किल जीना यहॉ।
तोपासू !!
आहाहा... नुसता फोटो पाहुनच
मस्त आणि सोपी पाककृती.
In reply to मस्त आणि सोपी पाककृती. by प्रभाकर पेठकर
मस्तं...
मस्त!
हो.....
In reply to हो..... by दिपक.कुवेत
धन्यवाद....
तुम्चि रास तुळ आहे का?
In reply to तुम्चि रास तुळ आहे का? by त्रिवेणी
तुम्चि रास तुळ आहे का
In reply to तुम्चि रास तुळ आहे का by अभ्या..
नका वाईट वाटून घेऊ. माझी रास
In reply to नका वाईट वाटून घेऊ. माझी रास by त्रिवेणी
पण माझी
काहीच नाश्ता नसेल तर,
अरेच्च्या!!!!
सुंदर.....................
दिसतंय छान.
In reply to दिसतंय छान. by प्यारे१
प्रोसिजर तर उप्पीटासारखीच
भारीच !!
पिवळसर आणि वर कच्च तेल.... अहाहा...
अप्रतिम फोटो आहेत.