Skip to main content

मँगो शिरा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 27/06/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
Sheera साहित्यः १. रवा - १ वाटि २. साजुक तुप - पाव वाटि ३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल) ४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि ५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार) ६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते ७. पाव चमचा वेलचीपुड कॄती: १. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा २. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी ३. परतलेल्या रव्यात उकळलेले दुध/पाणी घालावे व दणदणीत वाफा काढुन रवा मोकळा करावा. गरज भासल्यास रवा मोकळा करण्यासाठि परत दुधाचे हबके मारुन १-२ वाफा काढाव्या ४. आता त्यात मँगो पल्प, चवीनुसार साखर व वेलचीपुड घालुन एकजीव करावा व एक १०-१५ मि. गॅस बंद करा. मधे मधे ढवळलात तरी ठिक अन्यथा शिर्‍याची खरपुड पण छान लागते. निदान मला तरी आवडते :) ५. वरुन बारीक चीरलेले बदाम/पिस्ते पेरुन गरमा गरम मँगो शिर्‍याचा लुफ्त घ्यावा टिप: मँगो पल्प शक्यतो मिक्सर मधुन काढु नका. शिरा खाताना मधे मधे जो आंब्याचा गर येतो त्याने खायची लज्जत अजुन वाढते. कॅन मधला असेल तर पर्याय नाहि :D

वाचने 11468
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हो....... आंबा असल्यावर वेलची घालू नये...फक्त आंब्याचा स्वादच छान लागतो... मी परवाच असा शिरा बनवला होता..ताजा आंब्याचा रस घालून....या मध्ये मी आंब्याच्या फोडी घातल्या होत्या व थोडा रसही घातला होता

अलीकडेच करुन चापल्याने या वेळी जळजळ अंमळ कमी झाली. :) बादवे गोड शिर्‍यात टॉमेटो पहिल्यांदाच पाहिला. ;)

त्या दणदणीत वाफा कशा काढायच्या हो? आता वरचा फोटो बघुन जी जळजळ होतेय ती ही दणदणीत म्हणावी काय? मस्ताड हो दिपक राव!!

In reply to by मीनल

झकास्स्स ! :) माझ्या सासुबाई आंबा भात करतात. तो ही असाच अफलातून होतो. च्यामारी आपल्याला तर फक्त नारळी भात माहित होता... ये अंबा भात किधर से आया ? ;)

In reply to by विजुभाऊ

तुमच्या सासूबाईंच्या लेकीसमोर असं बोलू नका! नाहीतर तिखटजाळ कॉमेंट्स ऐकाव्या लागतील!

आपल्या/दुसर्‍याच्या सासुबाई, लेकि, सुना, ताई, माई, आक्का अगदि कुणलाहि हा शिरा बनवायला सांगा आणि मनमुराद आनंद लुटा (खायचा :D) अवांतर: पुजा आज्जी अगं आहेस कुठे? तुझ्या प्रतिसादाविना माझी पाकॄ म्हणजे दुधाविना साखर, फुलाविना सुवास, सुर्याविना प्रकाश, चंद्राविना...(जाउदे योग्य यमक सापडत नाहिये...भावना समजुन घे :D)

In reply to by दिपक.कुवेत

=)) दीपूकाका भावनाबद्दल काकुला माय्तेय का ??? ( भयानक घाबरीघुब्री स्मायली कल्पा बॉ आता तुमीच :-/ ) आवो काका निल्कांत काकानी मिपा बंद करुन ठेलोतं ना :-/ म्हनुन येत नोव्ती .. यील तेवा बण्दच अस्साचं :-/ :-/ आता यीन तुमच्या पाक्रुत नकोतेवा साखर , फुलं , प्रकाश , चंद्र जे मिळल ते मिसळाय्ला :D :P