णमस्कार लोक्स,
बच्चेकंपनीला फळं खाउ घालायची म्हणजे कर्मकठिण काम. पण रेडिमेड ज्युसचा ग्लास समोर ठेवला कि तो एका मि. फत्ते! ह्याशीवाय रेडिमेड ज्युसेसनी कितीहि "ओरीजनल", "नो शुगर अॅडेड" असा दावा केला तरी फ्रेश ज्युसची सर काय त्याला नाहि. म्हणुन हा प्रपंच! सीजनल मिळणार्या फळांचा ताजा पल्प घरीच काढुन जssssरा खालच्या पद्धतीने सादर करा....बच्चेच काय मोठे सुद्धा धावत येतील कि नाहि पहा!
साहित्यः
१. कोणतीहि ४ सीजनल फळं (संत्री/मोसंबी सोडुन) - मी चेरी, टरबुज, किवी आणि आंबा घेतलाय
२. मध - प्रत्येकि १ चमचा
३. बर्फाचे खडे - ३ ते ४
४. उंच ग्लास
५. सजावटिसाठि लगडलेल्या चेरीज/आंबा/मोसंब्याची काप, पुदिना पान यापैकि काहिहि
कॄती:
१. चेरी / टरबुजाच्या बीया काढुन घ्या. किवीचे साल काढुन त्याचे तु़कडे करुन घ्या. आंब्याचा रस/पल्प काढुन घ्या
२. आता मिक्सर मधे प्रथम चेरी आणि १ चमचा मध घालुन त्याची प्युरे/पल्प तयार करावा. हिच पायरी टरबुज, किवी आणि आंब्यासाठि करावी. फक्त प्रत्येक वेळि मिक्सरच भांड स्वच्छ धुवुन घ्यावं म्हणजे फळांचे रस/रंग एकमेकांत मिसळणार नाहि. प्रत्येकाचा पल्प वेगवेगळ्या भांड्यात तयार ठेवावा
३. आता सर्विंग/उंच ग्लास घेउन त्यात ३/४ बर्फाचे खडे टाकावे
४. आता एका मोठया चमच्याने तळाशी चेरीचा पल्प हळुवार घालावा. ग्लास हलकासा हलवुन पल्प सेट होउ द्यावा
५. आता ग्लास हळुवारपणे गोलाकार फिरवत एका दुसर्या चमच्याने टरबुजाचा पल्प ग्लासच्या कडेकडेने गोलाकार घालावा.
६. हिच पायरी किवी आणि आंबा पल्प घालुन करावी
७. सजावटिसाठि जे उपलब्ध असेल त्याने सजवुन मॅजिक लेयर्सचा ग्लास पेश करावा
टिपा:
१. शक्यतो ज्या फळांचा घट्ट पल्प निघेल (उदा. केळं, चीकु, स्ट्रॉबेरी, अवकादो ई.) अशीच फळं घ्यावी जेणेकरुन लेयर्स सेट होतील. संत्री, मोसंबी, कलिंगडचा रस पातळ असतो म्हणुन त्यांची लेयर सेट होणार नाहि.
२. फळांच्या पल्पचा क्रम आपापल्या आवडिनुसार ठरवावा
३. अशीच दोन किंवा तीन फळं घेउन डबल किंवा ट्रिपल लेयर्स करु शकतो

वाचने
9428
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा फोटो जर जीवंत झाला तर काय
भा री ही!!!
ताजेतवान पेयं.
जबर्या डीटेल्ड प्रतिसाद!!
In reply to ताजेतवान पेयं. by प्रभाकर पेठकर
काय काय अफाट बनवतोय राव हा
++++++++११११११११ टू अगोबा...
In reply to काय काय अफाट बनवतोय राव हा by प्रचेतस
अरे मग आत्म्यांना काय
In reply to ++++++++११११११११ टू अगोबा... by अत्रुप्त आत्मा
वा..कलरफुल ग्लास छान दिसतो आहे.
फोटु एकदम किल्ल्ल्ल्लरर् आलाय
इट्स ए रिअल मॅजिक....
हा मानसिक छळ आहे.
अतिशय सुंदर
गणेशा मोड ऑन झाला असता तर लै
अप्रतिम कल्पना !!
मस्त !!
मस्तच!
मस्तच.
अय्या दीपूकाका माझ्यासाठी
हो गं पुजा आज्जे
In reply to अय्या दीपूकाका माझ्यासाठी by जेनी...
वा !
जीव गेला..
हे असाच फ्रुट dessert आमच्या ऑफिस मध्येही मिळायचं
गडबड तर नाही...
In reply to हे असाच फ्रुट dessert आमच्या ऑफिस मध्येही मिळायचं by टपरी
खासच.. आपल्याला स्वयंपाककला
रीफ्रेशिंग..
छान
धन्यवाद लोक्स
सुरेख कलरफुल फोटो आवडला.
सुंदर कलरफुल
मी तुम्च्याशी आणि सानिकाशी