साहित्य-(2 जणांसाठी)
बाजरी- 1 ½ वाटी
तूर डाल- ¾ वाटी(1/2 तास आधी भिजवून घ्यावी)
तांदूळ- 5-6 टेबलस्पून
शेंगदाणे व खोबर्याचे काप- आपल्या आवडीप्रमाणे
हळद – ½ चमचा
लाल तिखट- आवडीप्रमाणे
कांदा लसूण मसाला किवा गोडा मसाला- 2 टेबलस्पून
कांदे-2
मीठ- चवीनुसार
कृती-
बाजरी 1 तास भिजत घालावी.
नंतर एका कपड्यावर घरातच वाळत घालावी.
बर्यापैकी वाळल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यात अगदी कमी वेळ फिरवावी. (2-3 spin)
नंतर पाखडून घ्यावी म्हणजे बाजरीची टरफळे निघून जातील.
आता एका पसरट पातेल्यात तेल तापवून जिरे, मोहरी टाकून तडतडले की कांदा गुलाबी परतवून घ्यावा.
नंतर हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालावा.
बाजरी+तूर डाळ+तांदूळ=2 वाटी असेल तर 5 वाट्या पाणी गरम करून फोडणीत घालावे.
पाण्याला उकळी आली की बाजरी+तूर डाळ+तांदूळ एक एक करून घालावे.
चवीनुसार मीठ घालावे. कोथंबीर घालून शिजू द्यावी.
(बाजरीला पाणी जास्त लागत असल्यामुळे शिजताना अंदाजाने पाणी अजून घालावे.)
वाचने
6738
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
खूऽप दिवसात खाल्ली नाही.
मस्त पाकृ
धन्यवाद सर्वांचे
मस्त! आजी करायची तेंव्हा नाक
रेवती ताई मला एकेरी नावानेच
बाजरीची खिचडी खूप आवडायची
बाजरीची खिचडी खुप आवडते...
मस्त
उष्ण
बाजरी ही उष्ण असते. त्यामुळे
In reply to उष्ण by अत्रन्गि पाउस
बाजरी ही उष्ण असते. त्यामुळे
In reply to उष्ण by अत्रन्गि पाउस
इंटरेस्टींग पाक्रु..