ही एक गुजराथी रेसीपी आहे. मी माझ्या बहीणीकडे खाल्ली आणि आवड्ली म्हणून करुन बघितली. सर्वाना आवड्ली म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्ही पण जरूर करुन पहा.
साहित्य : बाजरीचे पीठ (ताजे दळून आणावे), दोन चमचे दही, आल लसूण मिरची पेस्ट, थोडी साखर, मीठ, ओवा चिमूट्भर, तीळ, कसुरी मेथी किंवा ताजी चिरलेली मेथी थोडीशी अथवा किसलेला दुधी, थोडे गव्हाचे पीठ, हळद, मिरची पावडर, दोन चमचे तेल.
सर्व साहित्य एकत्र करुन कणके प्रमाणे भिजवावे. प्लास्टिकच्या पिशवीवर गोळा ठेवून लाटावे. तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे. गरम खायला द्यावेत दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर छान लागतात. (फोटो काढायला विसरले नाहीतर छान दिसले असते)
वाचने
7326
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाजरा मेथीना ढेबरा
पाकृ चांगली वाटतीये. फोटू
हाहा
In reply to पाकृ चांगली वाटतीये. फोटू by रेवती
फोटो नसतील तर पाकृ फाऊल
थोडीशी थालपीठ सारखी वाटते
बउ सरस छे....
प्लीज पीठांचे प्रमाण सांगाल
हम्म
ठेपला ( ढेबरा)
प्रमाण?
बाजरीचे पीठ जास्त घ्यायचे
करुन बघितले बरे झाले