पायसम
पायसम
साहित्य--एक वाटी बारीक शेवया(जाड असल्यास अर्धा वाटी),एक लिटर दूध,दीड वाटी साखर,पाव वाटी साबूदाणा,वेलचीपूड,काजूकाप,पिस्ता
कृति-प्रथम साबूदाणा पाण्यात अर्धा तास भिजवावा,दूध आटवत ठेवावे,शेवया उकळत्या पाण्यात एक मिनिट टाकून त्यातील पाणी काढून टाकावे,नंतर आटवत ठेवलेल्या दूधात शेवया व साबुदाणा घालावा,चवीनुसार साखर घालावी,साखर नीट विरघळेपर्यंत दूध हालवित रहावे,थंड झाल्यावर वेलचीपूड,काजूकाप,पिस्ताकाप घालावेत. हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो.
वाचने
4259
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
वाह! मस्तच लागतं हे!
पण, त्यात साबूदाणा घालुन केलं नाहीए कधि, करुन बघायला हवं!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
पायसम आपले फारच आवडते. धन्यवाद.
वा! पायसम हा मस्तच प्रकार आहे. आपल्याला लई आवडतो..:)
धन्यवाद वैशाली.
तात्या.
आम्हाला एकदा बोलवा ना तुमच्याकडे जेवायला वैशालीताई...सगळ्या दाक्षिणात्य पाक्रु मस्त देताय तुम्ही.....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
:SS या ना वरदाताइ,आमच्याकडे जेवायला मलेशियात यावे लागेल,चालेल तुम्हाला?
वैशाली ताई (सगळ्यांना ताई म्हटले तर आमचि पंचाईत :-)),
मी आता मेलबोर्नला मलेशियाला मार्गे जाणार आहे, तेव्हा येतो तुमच्याकडे.मला आमंत्रणाची आवश्यकता नाही.
असो, कोणी भारतात आहे का?
वाह! मस्तच