साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती)
तीन मोठे बारीक चिरलेले कांदे.
एक मोठी वाटी लसूण.
अर्धी वाटी चिरलेले आलं.
मीठ.
दोन चमचे हळद.
एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार)
एक चमचा धणे.
५-६ लवंग.
८-१० काळी मिरी.
एक मध्यम उभा चिरलेला कांदा.
तेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले.
कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट
करत ठेवावे.भांड्यात तेल घालून तापले की त्यात बारीक चिरलेला कांदाघालून मऊ होईपर्यंत परतावा. नंतर
त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे.त्यातच मालवणी मसाला घालून चांगले परतावे.पाणी घालून चांगले शिजू
द्यावे.कढईत थोडे तेल घलून त्यात प्रथम धणे,लवंग्व मिरी परतून घ्यावे त्यातच उभा चिरलेला कांदा लालसर
होईपर्यंत परतावा.नंतर त्यात खवलेले खोबरे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.हे सर्व मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.
चिकन शिजले की त्यात हा वाटलेला खोबर्याचा मसाला घालावा.पाहिजे तेव्हडे पातळ करून चांगली उकळी
येऊ द्यावी.त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.सर्व्ह करतांना वरून सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घालावी.
चपाती,ब्रेड किंवा भाकरी बरोबर खायला द्यावे.
वाचने
10443
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालवणी मसाला कसा बनवावा ?
गणपाभौ मी दिलेली मालवणी
In reply to मालवणी मसाला कसा बनवावा ? by सस्नेह
मालवणी मसाला इथे पहावा.
In reply to गणपाभौ मी दिलेली मालवणी by ज्योति प्रकाश
धन्यवाद
In reply to मालवणी मसाला इथे पहावा. by गणपा
भारीच
जरा चमचमीत लागतं हो. नाहितर
In reply to भारीच by इरसाल
हुम्म्म
In reply to जरा चमचमीत लागतं हो. नाहितर by ज्योति प्रकाश
@" आलं" आणी "गेलं" अस नाही ना
In reply to हुम्म्म by इरसाल
ते खाउन झाल्यवरच समजेल...
In reply to @" आलं" आणी "गेलं" अस नाही ना by अत्रुप्त आत्मा
देवा मी मालवणी घरात का नाही
अप्रतिम!
चिकन अनेक प्रकारे करता येते.
मसाला पण एक वाटि आहो तुमचि
सुंदर आणि चवदार दिसतंय!
अहा..... एकदम झक्कास दिसतंय
धन्यवाद!
बाई ग! प्रत्येकवेळी प्रतिसाद
मस्त
धन्यवाद मंडळींनु.