मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेजिटेबल्स अँड एग फ्राईड राईस

सानिकास्वप्निल · · अन्न हे पूर्णब्रह्म
. साहित्यः दीड वाट्या बासमती तांदळाचा मोकळा शिजवलेला भात ३-४ अंडी फेटून घेतलेली १ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी १ वाटी पातळ उभा चिरलेला गाजर १ वाटी पातळ उभी चिरलेली भोपळी मिर्ची १/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी १/२ कप कांद्याची पात चिरुन पातीचे कांदे उभे चिरुन १/२ टेस्पून आले १ टेस्पून लसूण दीड टेबल्स्पून सोया सॉस दीड टेबल्स्पून हॉट चिली सॉस (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेबल्स्पून स्वीट चिली सॉस १ टीस्पून पांढरी मिरपूड (आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ लागले तर तेल . पाकृ: प्रथम नॉन-स्टीक पॅनमध्ये फेटलेली अंडी घालून चमच्याने सतत हलवत रहावे. जसे जसे अंडी शिजू लागतील तसे ते गोळा होऊ लागेल. (स्क्रॅम्बल्ड एगप्रमाणे) अंडी पूर्ण शिजली की बाजूला काढून ठेवावी. . त्याच पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे व त्यात बारीक चिरलेले आले + लसूण चांगले परतवून घ्यावे. त्यात चिरलेला पातीचा कांदा व फरसबी घालून ४-५ मिनिटे परतावे. आता त्यात चिरलेला कोबी व भोपळी मिरची घालावी. आच मध्यम असावी. सगळ्यात शेवटी चिरलेला गाजर व कांद्याची पात घालावे व ३-४ मिनिटे परतावे. सगळ्या भाज्यांचा थोडा करकरीतपणा (क्रंचीनेस) असला पाहिजे. . आता त्यात सोया सॉस, हॉट चिली सॉस, स्वीट चिली सॉस व पांढरी मिरपूड घालून सगळे एकत्र करावे. चव घेऊन बघावे, लागले तरचं मीठ घालावे, सगळ्या सॉसमध्ये मीठ असते. (भातात ही शिजवताना मीठ घातले होते) आता त्यात शिजवलेली अंडी व शिजवलेला भात घालून नीट मिक्स करावे. सगळ्या भाताला सॉस व भाज्या नीट लागल्या पाहीजे. झाकून एक वाफ काढावी. . गरमा-गरम व्हेजिटेबल - एग फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे. आवडत असल्यास तुम्ही व्हेज किंवा चिकन मंच्युरियन बरोबर किंवा हनी - चिली पोटॅटो बरोबर सर्व्ह करु शकता. .

वाचन 64124 प्रतिक्रिया 43