Skip to main content

चॉकलेट सुफ्ले

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 09/04/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट सुफ्ले हा प्रकार तसा करायला खटपटीचा. बेस म्हणून वापरले जाणारे बेचामल सॉस नीट जमणे महत्वाचे. त्यामुळे मी बरेचदा शॉर्टकट वापरते. ही शॉर्टकट रेसिपी गुड हाऊस किपिंग मासिकातील आहे. साहित्य: ४ औस बिटरस्वीट चॉकलेट चिप्स १/३ कप स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क २ अंड्याचा बलक ३ अंड्यातले फक्त पांढरे रॅमिकिन्सना आतुन लावण्यासाठी थोडे बटर आणि १ टे स्पून ग्रॅनुलेटेड साखर ( बारीक दळलेली साखर) थोडी आयसिंग शुगर वर भुरभुरवण्यासाठी कृती: ओवन ३७५ फॅ. ला तापत ठेवा. ४ औस मापाच्या रॅमिकिनला आतून बटर लावून घ्या. नंतर त्यात थोडी ग्रॅनुलेटेड साखर घालून रॅमिकिन हळू हळू फिरवा आतून साखरेचा थर बसेल. जास्तीची साखर झटकून टाका. असे चारही रॅमिकिन्सला करा. मायक्रोवेव मधे चालेल अशा बोलमधे चॉकलेट चिप घालून १५-२० सेकंदाच्या अवधीसाठी गरम करा. ढवळून पुन्हा १५-२० सेकंद गरम करा. असे साधारण एक ते दिड मिनीट केल्यावर चिप्स वितळतील. मावेतून बाहेर काढून वितळलेल्या चॉकलेट मधे कंडेन्स्ड मिल्क घालून वायर विस्क वापरून ढवळा. आता त्यात दोन अंड्याचे बलक घालून ढवळून एकजीव करा. आता अंड्यातील पांढरे हँड किंवा स्टँड मिक्सर वापरुन फेटायला घ्या. ३-४ मिनिटे फेटल्यावर मिश्रण मिडीयम स्टीफ होईल. यातले १/३ पांढरे चॉकलेटच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने ढवळा. एकजीव झाले की त्यात उरलेले पांढरे घाला. आता रबर स्पॅट्युला वापरुन अंड्याचे पांढरे हलक्य हाताने मिश्रणात फोल्ड करा. तयार मिश्रण ४ रॅमिकिन्स मधे हलक्या हाताने घाला. वरुन थोडी आयसिंग शुगर भुरभुरवा. आता रॅमिकिन्स कूकी शीट वर ठेऊन ओवन मधे ११-१३ मिनिटे बेक करा. रॅमिकिनच्या कडेच्या साधारण १ इंच वर सुफ्ले आला पाहिजे. बेक करताना ओवन मधे उघडू नका. ओवन मधून बाहेर काढून लगेच वाढा कारण १-२ मिनिटात सुफ्ले फ्लॅट होतो.

वाचने 4981
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

झक्कास गो :) ( चला अजुन एक रेड कलरचा चमचा दाखल झाला मि.पा.वर अगदी सानिकातैच्या ब्लु अन सर्वाच्या फेवरेट चमच्यासारखा >) ;)

एकदम ज ब रा ट पाकृ आहे. बघूनच जीभेवरती चव पसरली. बाकी अंडी कोंबडीची, बदकाची का शहामृगाची ते स्पष्ट केले नसल्याने बहूदा मदनबाण भरकटला असावा. फटूतली अंडी कोंबडीची दिसत आहेत.

आत्ता लगेच खावासा वाटत आहे गं ताई :)

कुणी करून दिलं तर अजूनच छान!

सुफले मस्त दिसते आहे, स्वाती

जबरदस्त पाककृती :) :)

सुपर्ब :)

या फुटू मधून कॉफी करून आपल्या "डायनिंग टिबल" वर पेस्ट करता यायला पाहिजे होत राव लई झाक झाल असत '''''''''''