मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कांदा भजी / खेकडा भजी

जागु · · पाककृती
साहित्य : ३ ते ४ मोठे कांदे बेसन पाव किलो २-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड थोडी कोथिंबीर चिरुन चिमुटभर हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल) मिठ तेल पाककृती : प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल. Image removed. आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे. Image removed. पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे. Image removed. एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी :स्मित: गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते. Image removed. मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या. Image removed. अधिक टिपा : धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे. मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.

वाचन 16025 प्रतिक्रिया 45