बरेच दिवस काही लिहीलं नाही, म्हणलं चला एखादी पाकृ टाकूया. भले मग कोणी झैरातीचा धागा का म्हणेना !! भारतीय संविधानातला अभिव्यक्तिस्वातंत्र्य वैगरे कसलासा अधिकार घेऊन म्हटलं लिहायला काही हरकत नाही. ;) तर काय म्हणत होतो...हां, पाकृ आहे बालूशाहीची. गोष्टी आयत्या खाण्यापेक्षा त्या करुन पाहायची खुमखुमी भारी. त्यामुळे या पाकृच्या दोन तीन रेशिप्या डोळ्याखालून घालून झाल्या. त्यातल्या सगळ्यातलं मनाला जे पटलं ते उचलून ही पाकृ केलेली आहे, कारण काही रेशिप्यांमध्ये मैद्याच्या निम्मं तूप घालायला सांगितलं होतं. तसा प्रकार केला असता तर बालूशाही नक्की कढईत विरघळली असती. असो, तर साहित्य पुढीलप्रमाणे,
मैदा २ वाट्या
दही अर्धी वाटी
तूप अर्धी वाटी
बेकिंग पावडर पाव टीस्पून
खाण्याचा सोडा चिमूटभर
पाकासाठी एक वाटी साखर
थोडं केशर
मैदा चाळून एका पातेल्यात घेऊन त्यात बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा मिसळून घ्यायचा. नंतर तूप वितळेल इतपत गरम करायचं, फार गरम होता कामा नये मोहन घालायचं नाहीये. आता हे वितळलेलं तूप मैद्यात ओतून नीट मिसळून घ्यायचं. त्यानंतर त्यात दही घालायचं. दही घालून निव्वळ कालवल्यासारखं करायचं, मळायचं नाही. दही घातल्यानंतर हे असं दिसायला हवं. कोरडं वाटतंय म्हणून आणखी थोडं दही घालावं असा विचार पण करु नका.
आता अर्धा तास त्याच्याकडे ढुंकून बघायचं नाही. पाक करताना एक वाटी साखर बुडेल इतपत पाणी घेऊन एकतारी पाक करायचा. थोडं केशर घालायचं. आता पाऊण तासानंतर पीठाचे छोटे चपटे उंडे, पेढे काय म्हणाल ते करायचे आणि ते करताना तुम्हाला बालूशाहीचा जेवढा आकार अपेक्षित आहे त्याच्या निम्म्या आकाराचे करायचे. कारण बालूशाही तळल्यानंतर बर्यापैकी फुलते. त्या गोळ्याला अंगठ्याने मधोमध एक खळगा करायचा. मात्र आता गोळे करताना ते नीट मळून मगच आकार द्या, आता प्रश्न येतो आधी नाही मळलं आता का मळायचं ?? आधी मळून आता पुन्हा ते थोडंफार मळावंच लागणार होतं, मैद्याच्या गोष्टी खुसखुशीत व्हायच्या असतील तर फार मळू नये. ( अर्थात ही एका बालूशाहीच्याच व्हिडोत मिळालेली टीप आहे.) गोळे साधारण असे दिसतील.
आता कढईत मंद आचेवर तळून काढा. आच वाढवली तर वरवर रंग आला तरी आत कच्चंच राहील. खालच्या चित्रात वर जो एक तळलेला गोळा दिसतोय तो गोळे करताना पीठ वरचेवर मळून केलेला आहे आणि खाली जे दोन आहेत ते गोळे करण्याआधी पीठ नीट मळल्यानंतरचे आहेत. थोडक्यात वरचा बिनसलेला आहे.
आता ही तळलेली बालूशाही पाकात घालून १०-१५ मिनीटांनी बाहेर काढा. बालूशाही तयार आहे.
कोणाला याची आणखी चांगली पद्धत माहीत असल्यास जरूर सांगा.

वाचने
13638
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्यात लाश्टचा फटू कातिल
सूड चांगलाच पेटलेला दिसतोय.
@गणपा शेफ
In reply to सूड चांगलाच पेटलेला दिसतोय. by गणपा
वा मस्तच.... मला बालुशाही खुप
इसका जवाब मिलेगा.....
शेवटचा फोटू मस्त!तुझे अनेक
मिपावरचे बहुतेक ब्याचलर लोक
बालुशाही अगदी शाही झालेली
कोण सुड का ? व प्या झाला आता
स्पा?
In reply to कोण सुड का ? व प्या झाला आता by पियुशा
त्याला फक्त भेळ करता येते!
In reply to स्पा? by पैसा
आता स्पा च्या रेशेपिच्या
In reply to कोण सुड का ? व प्या झाला आता by पियुशा
ग्रेट!
लैच भारी.... अजून येऊ द्यात
अहाहा ! मस्त मस्त मस्त
व्हीटी रेल्वे स्टेशनच्या आवारात
खाजा का म्हणतात ? कणिक, मैदा,
In reply to व्हीटी रेल्वे स्टेशनच्या आवारात by रामदास
भारी आहे....
In reply to व्हीटी रेल्वे स्टेशनच्या आवारात by रामदास
फक्त??
In reply to व्हीटी रेल्वे स्टेशनच्या आवारात by रामदास
सर्वसाधारण पणे
In reply to फक्त?? by प्रभाकर पेठकर
म्हणजे कसं?
In reply to सर्वसाधारण पणे by रामदास
व्यनी
In reply to म्हणजे कसं? by प्रभाकर पेठकर
आंध्रप्रदेशात काकीनाडा येथील
In reply to व्हीटी रेल्वे स्टेशनच्या आवारात by रामदास
मस्तच हो!
मस्त.
अगं माऊताई, किती लक्षात राहतं
In reply to मस्त. by कवितानागेश
चायला
In reply to मस्त. by कवितानागेश
बालु ( की लू) शाही करून
मुलीकडली आल्यावर कसं वागाचं
In reply to बालु ( की लू) शाही करून by इन्दुसुता
@एकाच्या दाखवण्याच्या
In reply to मुलीकडली आल्यावर कसं वागाचं by रेवती
अरे वा.. पुरुष मंडळींचा
याला शर्विलकाचा प्रतीशंखनाद
In reply to अरे वा.. पुरुष मंडळींचा by मराठमोळा
चायला लैच भारी रे हा पदार्थ
जा जा. बघ जरा कसा तयारीचा
In reply to चायला लैच भारी रे हा पदार्थ by स्पा
चायला
In reply to जा जा. बघ जरा कसा तयारीचा by रेवती
>>>काय वाकड केलंय तुमच..
In reply to चायला by स्पा
तुम्हा मुलांचे असे प्रतिसाद
In reply to चायला by स्पा
फायनली यु डिसायडेड !! कधी
In reply to तुम्हा मुलांचे असे प्रतिसाद by रेवती
जसा काही वाटच बघतोयस! या वयात
In reply to फायनली यु डिसायडेड !! कधी by सूड
भारीच रे, एकदम जबरा झालीय
वा..
चान चान !!!! पुढील मुंबई
एकदम झक्कास आणि
वा! छान!
छान छान...पण दही थोड कमी घातल
छानच!!!!
वा रे! झकास! बरंच काय काय