शेझवान पोटॅटो विथ व्हेज हक्का नुडल्स
साहित्य शेझवान पोटॅटो:
अर्धवट उकडलेले छोटे बटाटे अर्धे कापून घेणे (तुम्ही बटाट्याच्या जाडसर फोडी ही करु शकता)
१ कांदा उभा चिरलेला
२ टेस्पून बारीक चिरलेला लसूण (चायनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते, आपल्या आवडीप्रामाणे कमी-जास्त करणे)
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
५-६ लाल मिरच्या वाटून पेस्ट (मिरच्या गरम पाण्यात ३-४ तास भिजवणे व त्यातल्या बिया काढून मिक्सरवर पाणी न घालता वाटून घेणे)
३ टेस्पून कॉनफ्लोअर
१ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
१ टीस्पून साखर
१ कप व्हेज स्टॉक (पाणी ही वापरू शकता)
१ टेस्पून सोया सॉस
तेल
पाकृ:
प्रथम अर्धवट उकडलेल्या बटाट्यांना कॉनफ्लोअर लावून डीप फ्राय करुन घ्या.
एका पॅनमध्ये २ टेस्पून तेल घालून चिरलेला लसूण व आले घालून परता.
चांगले परतले की त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतणे.
त्यात वाटलेली लाल मिरची पेस्ट घालावी (आपल्याला तिखट किती सोसवेल त्याप्रमाणे)
चांगले परतले गेले की त्यात सोया सॉस व काळीमिरीपूड घालावे.
चवीपुरतं मीठ व साखर घालावी. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे)
त्यात आता १ कप व्हेज स्टॉक घालून उकळी आणावी.थोडेसे कॉनफ्लोअर पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घालावी, म्ह्ण्जे मिश्रण घट्ट होईल.
शेझवान सॉस दाट झाला की त्यात तळून ठेवलेले बटाटे घालावे व कितपत अजुन दाट हवे तसे शिजवावे.
त्यात थोडी चिरलेली कांद्याची पात घालावी.
आवडत असल्यास सॉस बनवताना आंबट्पणासाठी त्यात थोडे विनेगर घातले तरी चालेल.
साहित्य व्हेज हक्का नुडल्सः
१ पॅकेट हक्का नुडल्स
१ वाटी पातळ व उभा चिरेलेला पानकोबी
१ वाटी पातळ व उभा चिरेलेला गाजर
१ वाटी पातळ व उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ वाटी चिरलेली फरसबी
२ पातीचे कांदे पातळ व उभे चिरलेले
कांद्याची पात बारीक चिरलेली
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टेस्पून बारीक चिरलेले आले
मीठ चवीनुसार
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टेस्पून सोया सॉस
तेल
पाक्रु:
पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर तेल व थोडे मीठ घाला.उकळी आली की त्यात नुडल्स घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका, त्यावर थोडे थंड पाणी घाला व निथळत ठेवा.
एका पॅन किंवा कढईत तेल गरम करून आले-लसूण घाला व परता.
त्यात चिरलेला पातीचा कांदा घालून परता.
आता त्यात फरसबी, गाजर व कोबी घालू परता.(पटापट परतायला हवे, आणी खुप वेळ नाही परतायचे, भाज्या थोडया कच्च्याच हव्यात )
त्यात आता भोपळी मिरची घालून परता.
त्यात सोया सॉस, मीठ व काळीमिरीपूड घाला. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे)
त्यात शिजवलेल्या नुडल्स घालून परतणे व वरून चिरलेली कांद्याची पात घालणे.
व्हेज हक्का नुडल्स तयार.
गरमा-गरम हक्का नुडल्स शेझवान पोटॅटोबरोबर सर्व्ह करणे.
वाचने
21137
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
_/\__/\__/\__/\__/\_
पा.क्रु.नेहमी प्रमाणेच
खूप छान
मस्त! मस्त्!! मस्त!!! मला
In reply to मस्त! मस्त्!! मस्त!!! मला by रेवती
अगदी अगदी!! मलाही हेच वाटलं..
बटाटे लई भारी दिसताहेत, पण
नशीब जेवुन झाले आणी मग बघितले
मस्तच
छान.
बाय डिफॉल्ट
मस्तच!!!!
मस्तच
जाम भारी ...जबरदस्त.
अतिशय आवडली ...
खुपच छान. तोंपासु.
जबराट.
पाककृतीत चायनीज मसाला ठासून
मराठी?
In reply to मराठी? by daredevils99
कोणी उत्तर देईल?
In reply to कोणी उत्तर देईल? by daredevils99
शेझवान बटाटे, शाक हक्का
In reply to शेझवान बटाटे, शाक हक्का by स्वानन्द
शेझवान बटाटे, शाक हक्का
सह्हीच... हक्का नुडल्स
मस्त !!
बहुत बढीया
खल्लास !!!
सेलरीशिवाय शेझवान सॉस???? मी
In reply to सेलरीशिवाय शेझवान सॉस???? मी by कवितानागेश
नाही मी सेलरी विसरले नाही
पा.कृ. आणि फटु
झक्क्क्कास
हायला!!
जबरदस्त प्रेझेंटेशन..
वा!!! मस्तच! चायनीज इतक्या
खुपच सॉलीड..
हा धागा आणि फोटो
चायनीज मध्ये बटाटा हा नवाच
मला वाटतं.....
In reply to मला वाटतं..... by प्रभाकर पेठकर
काकांच्या या असल्याच छोट्या
In reply to मला वाटतं..... by प्रभाकर पेठकर
मी ह्या पाकृमध्ये छोटे (दम आलू वाले) बटाटे
तिरफळं..
In reply to तिरफळं.. by प्रभाकर पेठकर
संजीव कपूर
In reply to तिरफळं.. by प्रभाकर पेठकर
तिरफळं छायाचित्रं....
In reply to तिरफळं छायाचित्रं.... by प्रभाकर पेठकर
तिरफळं मला माहीत आहेत
शेझवान पेपर आणी शेझवान चिलीज
वाह !!
काय कारण असावं?
In reply to काय कारण असावं? by ऋषिकेश
सोया सॉस घातल्यावर
चू चू चिंग फु = लय भारी हो !
पाककृती आता दिसत नाही. काही
साधारण २० माणसांसाठी हा