Skip to main content

झटपट काजु-खोबर्‍याचे लाडू

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 14/07/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अडीच वाट्या डेसीकेटेड कोकोनट (सुक्या खोबर्‍याचा कीस) पाऊण वाटी कडेंन्सड मिल्क एक वाटी काजुपूड दीड चमचा साजुक तुप ३-४ चमचे पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, कडेंन्सड मिल्क असुनही थोडी पिठीसाखर घालावी लागते कारण सुक्या खोबर्‍यामुळे गोडवा कमी होतो). १ छोटा चमचा वेलचीपुड - पाकृ: तुपात डेसीकेटेड कोकोनट खमंग, चांगला परतून घेणे. . दुसर्‍या बाऊलमधे कडेंन्सड मिल्क, काजुपुड, पिठीसाखर व वेलचीपुड घालून, मिक्स करणे. (गुठळ्या होऊ न देणे) . आता त्यात जितके मावेल तितके परतलेले डेसीकेटेड कोकोनट घालणे. . तयार मिश्रणाचे लाडू वळ्वणे व थोड्या डेसीकेटेड कोकोनटमध्ये घोळवणे. लाडू खाण्यास तयार आहे. .

वाचने 10310
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मेलो, खपलो, तुमचं करणं आणि तुमची भांडी आणि फोटो जाम भारी आहे. एक शंका, - तो प्लॅस्टिकचा चमचा जळत नाही का हो खोबरं भाजताना. ?

हं यम्मी दिसताहेत लाडु ,तस लाडु माझा वीक पॉईंट आहे ,म्हणुन येऊ द्या अजुन .

अहाहा..एकदम यम्मी .... सजावट जाम आवडली फोटो अतिशय सुंदर

मस्तच दिसत आहेत लाडू. मी फक्त ओलं खोबरं घालून केले . ते ही छान झाले.

लाडू मस्तं दिसत आहेत :)