Skip to main content

चटपटीत भेळ

लेखक स्पा यांनी सोमवार, 28/03/2011 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मिपावरची पहिली वहिली पाक्रु (गणपा, निवेदिता तै, स्वाती तै आदी प्रभूतींनी सांभाळून घ्यावे ;) ) थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही चटपटीत भेळ (४ माणसांसाठी) साहित्य : कुरमुरे - ८ वाट्या फरसाण - २ वाट्या बारीक शेव - १ वाटी कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६ टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले) खजूर - १ वाटी चिंचेचा कोळ - अर्धी वाटी गुळ - १ चमचा जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता कृती :- गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार . आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की ;)

वाचने 22164
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

काय फोटू म्हणायचं का काय वो हे? स्क्रीनकडं हात गेला न्हवं का सगळी भ्येळ गाप्प करायला :) चला,आता पुढच्या भटकंतीला स्पाशेठला घेऊन जाऊ. स्पाशेठ, भटकंतीला येताना पाठीवरच्या सॅकमध्ये भेळेचे जिन्नस आणि डोक्यावर पातेलंच घालून या. :D अवांतर: ह्याच्या लग्नाला 'बारातीयोंका स्वागत स्पा भेळ' ने होणार वाटतं. ;)

In reply to by स्पा

१ थर्मास, १/२ किलो बर्फ १ प्लॅस्टिकची पुरचुंडी हवी तित्की चटणी. कृती: एक थर्मास स्वच्छ धुवून घ्यावा. आता अर्धा किलो बर्फ बारीक कुटुन त्याचा चुरा करावा. हा बर्फाचा चुरा थर्मासमध्ये नीट बसवावा.चटणी किती आहे ते पाहून साधारण तेव्हढी जागा ठेऊन उरलेला थर्मास बर्फाने भरून घ्यावा. आता ती चटणी प्लॅस्टिकच्या पुरचुंडीत भरावी. ही पुरचुंडी त्या बर्फ भरलेल्या थर्मासमध्ये ठेवावी. थर्मासचे झाकण घट्ट लावून घ्यावे. चटणीचे आयुष्य वाढायला मदत होईल.

In reply to by धमाल मुलगा

''मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती नुसार पुदिना चटणी ३ ४ तासात खराब होते, जर फ्रीज मध्ये ठेवली नाही तर '' @ धमु, अरे आपण ३४ तासाच्या ट्रेकला जाणार आहोत का, आणि गेलो तरी स्पाची भेळ ३४ तासाच्या आतच संपेल ना. मग कशाला उगा वजन वाढवा सामानाचं, असु दे रे स्पा, तु घेउन ये चटणी, काही होत नाही ३४ तास चटणीला,

In reply to by धमाल मुलगा

अजुन एक आइडायची कल्पना अशी की घरातुन निघायाच्या आदल्या दिवशीच जर चटण्या डीप फ्रीज प्लॅस्टिकच्या पुरचुंडीत करुन ठेवल्या तरी त्यांचे आयुष्य वाढायला मदत होते. नंतर त्या हळुहळु वितळायला लागुन नॉरमालला यायला लागतात २-४-६ तासात (बाहेर किती तापमान आहे यावरुन). प्लॅस्टिकच्या पुरचुंडी भक्कम पाहीजे नाहीतर सगळीकडे चटण्या लागतील.

In reply to by स्पा

तुमी फकस्त रेशिप्याच ल्ह्या !! ;) आसू द्या, ती रेडिमेड भेळ मिळते न्हवं बाजारात काय ते हल्दिराम का काय; आमी त्येच इकत घिऊ. तुमचं चालू द्या. :D

लेका, भेळ नको, लाडु पाहीजे लाडु,