Skip to main content

कांद्याची चटणी------

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 04/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य--चिरलेले कांदा एक वाटी, चिंचेचा कोळ एक चमचा व गुळ चवीनुसार, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ.फ़ोडणीचे साहित्य.शेंगदाणा कुट दोन चमचे. कृती-- कांदा मिक्सरमधुन काढावा , चिंचेचा कोळ व गुळ, किसलेले सुके खोबरे ,शेंगदाणा कुट, लाल तिखट, मीठ चवीनुसार.सर्व एक्त्र मिसळून वरुन खमंग फ़ोडणी द्यावी.

वाचने 6399
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त झणझणीत असेल शंका नाही! :) पण फोटो तर द्या!!!

रेसेपीच नाव वाचुनच तिचे लेखक कोण असेल्?हे कळले होते :)

कांद्याची चटणी फार टिकत नाही त्यामुळे लगेच संपवावी लागते किंवा एका जेवणापुरतीच करावी लागते कारण दुसर्‍या दिवशी कांद्याच्या चटणीचा वास बदलतो. दोन दिवस पुरवून खायची असेल तर कैरी-कांद्याची चटणी मस्त. कच्च्या कैरीचा आंबटपणा, कांद्याची चव आणि लाल तिखटाची फोडणी. उन्हाळ्यातील सुख. :)

ह्यात कैरी किसुन घातली की कैरीची चटणी ;) बरोबर का न्हाय ? फोटू न टाकल्याबद्दल निषेध !!