साहित्य व्हेज फ्राईड राईस:
२ कप बासमती तांदूळ स्वछ धुवून गरम पाण्यात भिजवणे
१ कप पातळ उभा चिरलेला कोबी
१ कप पातळ उभा चिरलेला गाजर
१ कप पातळ उभी चिरलेली भोपळी /ढोबळी / ढब्बू / शिमला मिर्ची :)
१ कप बारीक चिरलेली फरसबी
१/२ कप कांद्याची पात चिरुन
१ छोटा कांदा व पातीचा कांदा चिरुन
१ १/२ टेबल्स्पून आलं-लसूण पेस्ट किंवा भरड वाटलेले
१ हिरवी मिर्ची उभी चिरलेली
२ टेबल्स्पून सोया सॉस
२ टेबल्स्पून टोमॅटो सॉस
१ टेबल्स्पून चिली सॉस
मीठ चवीप्रमाणे
१/४ वाटी तेल
पाकृ:
भिजवलेला तांदळाचा बोटचेपा भात शिजवून घेणे.भात शिजवताना १ छोटा चमचा तेल घालणे. शिजवलेला भात हलक्या हाताने मोकळा करुन गार करायला ठेवावा म्हण्जे भाताची शितं मोडणार नाहीत.
तेल तापवून त्यात प्रथम आलं-लसूण पेस्ट , हिरवी मिर्ची घालावी व परतावी.
त्यावर कांदा घालुन परतावा.
एक एक करून सगळ्या भाज्या घालाव्यात व पटपट परतत रहा.
वरील सर्व सॉस घाला व परता. आता त्यात शिजवलेला भात घाला आणी हलक्या हाताने एकत्र करा.
मीठ चवीप्रमाणे घाला. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे घाला)
सर्व सॉस भाताला सारखे लागले की भात उतरवावा.
साहित्य पनीर चिली:
२ कप पनीरचे तुकडे
१ कांदा उभा चिरलेला
१-२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
१ १/२ टेबल्स्पून आलं-लसूण पेस्ट किंवा भरड वाटलेले
१/२ कप कांद्याची पात चिरलेली
३ टेबल्स्पून सोया सॉस
१ टेबल्स्पून कोर्नस्टार्च थोड्या पाण्यात मिसळ्लेले
मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून काळीमिरीपूड
तेल
पा़कृ:
थोड्या तेलात पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेणे आणी हे तळ्लेले तुकडे पाण्यात भिजवणे म्हण्जे ते मग वातड होणार नाहीत, मऊच राहतील.
दुसर्या भांड्यात तेल तापवून त्यात हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट घालून परतणे.
आता चिरलेला कांदा, मीठ घालणे, सोया सॉस घालणे. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे घाला)
त्यात तळ्लेले पनीरचे तुकडे , काळीमिरीपूड घाला व नीट एकत्र करा.
१ कप पाणी घालून थोडे शिजवून घ्या.
कोर्नस्टार्च चे मिश्रण घालून, किती घट्ट हवे तितके शिजवून घ्या.
वरून कांद्याची पात घालून गरमा-गरम व्हेज फ्राईड राईस बरोबर वाढा :)
वाचने
15978
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... मस्त. त्यात पनीर
ए क णं ब र !!
In reply to वा... मस्त. त्यात पनीर by मदनबाण
`माझं असंही भातावर प्रेम
छान आहेत दोन्ही प्रकार.
वाह वाह! पनीर चिली म्हणजे
बेश्टच!
मी कधिच पनीर तळत नाही.फ्रोझन
+१ पण तळुन ही गरम पाण्यात ५
In reply to मी कधिच पनीर तळत नाही.फ्रोझन by पर्नल नेने मराठे
अग पण मी म्हणतेय तळायचे तरी
In reply to +१ पण तळुन ही गरम पाण्यात ५ by मुलूखावेगळी
मी आधी कुकर मधे सुमारे ३४
In reply to अग पण मी म्हणतेय तळायचे तरी by पर्नल नेने मराठे
इथे एवढ्या गहन विशयावर चर्चा
In reply to मी आधी कुकर मधे सुमारे ३४ by टारझन
मी एवढा अभ्यासपुर्ण प्रतिसाद
In reply to इथे एवढ्या गहन विशयावर चर्चा by पर्नल नेने मराठे
असं पणीर तुच खाउ शकशील...
In reply to मी एवढा अभ्यासपुर्ण प्रतिसाद by टारझन
अग पण मी म्हणतेय तळायचे तरी
In reply to अग पण मी म्हणतेय तळायचे तरी by पर्नल नेने मराठे
तळुन पाहिलेय मी.... मला न
In reply to अग पण मी म्हणतेय तळायचे तरी by मुलूखावेगळी
तळुन पाहिलेय मी.... मला न
In reply to तळुन पाहिलेय मी.... मला न by पर्नल नेने मराठे
अरे वा....मी पनिर सोनेरी
In reply to मी कधिच पनीर तळत नाही.फ्रोझन by पर्नल नेने मराठे
इकडे परिसंवादाचा बोर्ड
मस्त .. कोर्नस्टार्च म्हणजे
मस्त आहे पाकृ.. पण इथे पनीर
In reply to मस्त .. कोर्नस्टार्च म्हणजे by पुष्करिणी
ते घरी बनवणे सहज शक्य आहे.
In reply to मस्त आहे पाकृ.. पण इथे पनीर by Mrunalini
अग... हो... पण इथे आपल्या
In reply to ते घरी बनवणे सहज शक्य आहे. by मुलूखावेगळी
चुचु मराठे, मुलखावेगळ्या ताई
जरा कुठं डाएटींग करायला लागले
जब्बर पाकृंच्या फटूंवर बंदीबद्दल अर्ज..
असुर पाककृती विभागावर
शंका!!!
शंकानिरसन
पाककृती आता दिसत नाही. काही