Skip to main content

टोमॅटो राईस

Published on शुक्रवार, 04/02/2011
साहित्य : बासमती तांदुळ - १ वाटी लवंग - २ दालचिनी तेजपान - १ वेलची - २ जिरे - २ चमचे तेल मोहरी - १ चमचा चणा डाळ - १ चमचा उडीद डाळ - १ चमचा कढीपत्ता आलं बारीक कापुन - अर्धा चमचा साखर - चविपुरती मीठ कांदा बारीक कापुन - १ हिरव्या मिरच्या- २ टोमॅटो - ३ हळद - अर्धा चमचा लाल तिखट - १ चमचा धणे पावडर - १ चमचा गरम मसाला - अर्धा चमचा काजुचे तुकडे - १ चमचा कोथिंबीर कृती : तांदुळ धुवुन अर्धा तास ठेवुन द्यावे. एका भांड्यात २ चमचे तेल गरम करुन त्यात जिरे , तेजपान , दालचिनी , लवंग व वेलची घालावी. त्यात तांदुळ घालुन परतुन घ्यावेत. दोन वाट्या पाणी व मीठ घालुन मोकळा भात शिजवुन घ्यावा. भात जरा गार होउ द्यावा. नंतर एका भांड्यात २-३ चमचे तेल गरम करावे, त्यात चणा डाळ व उडीद डाळ घालुन थोडावेळ परतावे. नंतर मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर त्यात जिरे , काजुचे तुकडे , आलं , कढीपत्ता , हिरव्या मिरच्या घालुन परतावे. कांदा टाकुन गुलाबी रंगाचा होइपर्यंत परतावा. त्यानंतर हळद , लाल तिखट, धणे पावडर घालुन एकत्र करावे. यात बारीक कापलेले टोमॅटो , साखर , मीठ, गरम मसाला घालुन टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतावे. यात शिजवलेला भात घालुन चांगले एकत्र करावे. कोथिंबीर घालुन खायला द्यावे.

वाचन संख्या 6719
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

आह्!काय मस्त दिसतोय भात !आत्ताच डाऊन्लोड करुन घेते.

अशक्य !! गणपाभौ म्हणतोय तस शेवटचा फोटू खरच खत्तरनाक आला आहे ! सोपा दिसतोय, करुन बघायला हरकत नाही.

प्राजक्ता पवार,(तुझा एकेरी उल्लेख चालेल का नाही याचा खुलासा करावा नंतर ३ अंकी सं. मानापमान नको) धन्यवाद, भात कोणत्याही स्वरुपात (शाकाहारी) मला आवडतोच. आणि हा प्रकार पण झकास. आणि टोमॅटो राईस लाल न केल्याबद्दल धन्यवाद. हर्षद.

माझी आई असा भात टोमाटो प्युरी घालून करते. बरं झालं आठवण करून दिलीस...मी पण करून बघेन.

मलाही जाम आवडतो.. मी टोमॅटो पेस्ट/ प्युरी फोडणीत घालून घालून ती पूर्ण ड्राय होईपर्यंत परतते आणि मग त्यात मोकळा शिजवलेला भात घालते. अशाप्रकारे करून बघेन. आवांतर : सगळ्या सुगरणींना एक छोटासा सल्ला.. : मसालेदार भात, भाज्यांमध्ये (ज्यांना स्वतःचा असा मसाला नसतो जसे पाव-भाजीमसला , छोले मसाला) अशा भाज्यांमध्ये कधी कधी गरम मसाला ऐवजी किचन किंग मसाला घालून बघा.. रंग आणि चव दोन्ही छान होते. मी पुलाव आणि मिक्स व्हेज, मध्ये हा मसाला वापरला आहे. :)

In reply to by प्राजु

पाकृ आवडली, शेवटचा फोटो मस्तच आलाय! प्राजु किचन किंग मसाला म्हणजे कोणता गं? मी कधीच ऐकलं नाही नाव हे :(

फोटो पाहुन निशब्द झालो.

झबर्डस्ट.... फोटु तर एकदम जीवघेणा..!! वीकेंड्च्या अजेंडा मधे अ‍ॅड करण्यात आलेला आहे...

सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार :)

वाह ! खुप छान ही माझी आवडती डिश आहे . बरं झालं आठवण करून दिलीस. आज बनते आणि तुला कळवते. कशी झाली .