एवढे केक चे प्रकार बघून मला पण नाही राहवलं. म्हणून ...
सामग्री:
२ अंडी
१ १/२ कप गव्हाचे पीठ (किंवा मैदा)
१०० ग्राम बटर
१ कप साखर (डायेट शुगर पण वापरू शकता)
१/४ कप चॉकलेट चिप
१/४ कप कोको
१/४ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१ चमचा सोडा
१ चमचा व्हेनीला इसेन्स
मफिन्स आणि केक मधला मोठा फरक म्हणजे त्याला बनवण्याची पद्धत. केक किंवा कप केक बनवताना आधी लोणी आणि साखर क्रीम करून मग त्यात एक एक अंड घालून सगळ्यात शेवटी मैदा घालतात. मफिन्स करताना क्विक ब्रेड मेथड वापरतात. म्हणजे सर्व ओली सामग्री एका बाउल मध्ये मिक्स करायची आणि सर्व कोरडी सामग्री वेगळ्या बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि मग ओल्या सामग्री च्या भांड्यात, मैद्याचे मिक्स घालून, नित फेटून त्याला बेक करायचे.
ह्या मफिन्स मध्ये कोको आणि चोकलेट चिप्स दोन्हीचा वापर केल्या मूळे ह्याचे नाव - डबल चॉकलेट चॉकलेट चिप मफिन्स असे आहे. मफिन्स चे साचे नसतील तर ह्याला केक च्या भांड्यात पण बेक करता येते.
तर सोप्प आहे. अंडी, बटर, दूध आणि व्हेनीला इसेन्स एका भांड्यात चांगल मिसळून घ्या. मग दुसर्या भांड्यात गव्हाचे पीठ किंवा मैदा, कोको, बेकिंग पावडर, सोडा, चॉकलेट चिप, साखर असे नीट कालवून घ्या. आता ओल्या मिश्रणात कोरडे जिन्नस थोडं थोडं घालून नीट एकजीव होईपर्यंत कालवा. मफिन्स किंवा कप केक च्या साच्यात ह्याला बेक करा. १८० डिग्री ओव्हन टेम्प्रेचर वर २०-२५ मि लागतील.
वाचने
6445
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
खादाडताय ह्यातून अंडी वगळायचा
मिल्कमेड ट्राय करू शकता , अंडी वगळून
In reply to खादाडताय ह्यातून अंडी वगळायचा by पिंगू
"Live long and eat Muffins"
काय हो तुम्ही डायेटिशअन आहात
यम्म!
मिपाकर्स....
वा... पिंगू जे म्हणाला तेच
अमिता इझ बॅक
कच्ची कैरी धन्स
In reply to अमिता इझ बॅक by कच्ची कैरी
व्वा छान्. मस्तच आहे हा
खरंच मस्त प्रकार
In reply to व्वा छान्. मस्तच आहे हा by विजुभाऊ
विजुभाऊ आणि अवलिया जी
In reply to व्वा छान्. मस्तच आहे हा by विजुभाऊ
खायला कधी देणार? नुसते फोटू
पाककृती खुपच छान आहे. ही
मस्तच एकदम.... एक प्रशन -
नव्या मुंबईत चॉकलेट चिप्स
In reply to मस्तच एकदम.... एक प्रशन - by काजुकतली
अमिता धन्यवाद गं. तुझे
मला ही रेसिपी दिसत का नाही
करुन पाहिले