Skip to main content

नारळाचे मॅकरुन्स्

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. ही काही केकृ नाही. पण केक सदृष्य आहे म्हणुन देण्याचा मोह आवरता येत नाही. साहित्यः एक बाऊल नारळाचा चव. १/३ कप साखर/पिठीसाखर. ३-४ मोठे चमचे मैदा. व्हॅनिला इसेंस. २ अंड्यांतला पांढरा भाग. चिमुटभर मीठ. कृती: एका भांड्यात अंड्यांमधला फक्त पांढरा भाग वेगळा करुन थोडासा फेटुन घ्यावा. मग त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्याव. तयार मिश्रण साच्यामध्ये ओतुन घ्याव. ओव्हन २०० ते २२५ °C वर ठेवुन, २०-२५ मिनिटे बेक करत ठेवाव.

वाचने 5836
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मॅक्रोन्स मस्त..:) स्वाती

एक सांगायच राहिलं. मैदा नावापुरताच घातला आहे. पण त्या ऐवजी कॉर्न फ्लॉर वापरल तरी चालेल.

गणपा तुम्ही ग्रेटच आहात ,आता मला पाककलेत काही अडचण आली तर मी तुम्हालाच विचारनार हं!

अगदी सह्ही दिसताहेत मॅक्रोन्स .