मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामोसे

निवेदिता-ताई · · पाककृती
Image removed.From माधुर्य साहित्य:- मटार एक वाटी, बटाटा एक मध्यम,एक कांदा,मिरची-लसूण -आले पेस्ट एक चमचा, कढीपत्ता,मीठ, साखर एक चमचा, मैदा एक वाटी, तळणीसाठी तेल. कॄती:- प्रथम मैदयात एक चमचा कडकडीत मोहन घालून व किचिंत मिठ घालून घट्ट मळून ठेवा. कांदा बारीक चिरावा, मटार वाफ़वून घ्यावा,बटाटा उकडून घ्या,फ़ोड्णी करून त्यात कढीपत्ता टाका,आले-लसूण-मिरची पेस्ट घाला,कांदा घाला चांगला परतून घ्या नंतर त्यात वाफ़वलेले मटार,बटाटा फ़ोडी घाला , चवीनूसार मिठ,साखर घाला, थोडी कोथींबीर बारीक चिरुन घाला.हे झाले सारण तयार. आता भिजवलेल्या पिठातील थोडे पिठ घेउन त्याची पारी लाटून घ्या , त्याचे दोन भाग करा, प्रत्येक भागात सारण भरुन त्याचे सामोसे बनवा,कड्क तेल तापवून त्यात तळून घ्या..गरम सर्व्ह करा. यात चिंचेचे गोड पाणी ही घालून खातात.

वाचन 7929 प्रतिक्रिया 0