मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिकू मोदक

पिंगू · · पाककृती
आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी आहे खास नैवेद्य चिकू मोदक.. तर चला तयारीला लागू या. साहित्यः ६ चिकू, २०० ग्राम साखर, १ खवलेला ओला नारळ, कोको पावडर २ चमचे, दुध १ वाटी, खवा २०० ग्राम, चांदी वर्ख सजावट करायला.. प्रथम चिकूचा गर काढून घ्यावा. दुध, कोको पावडर, चिकूचा गर व खवलेला नारळ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्यात खवा मोडून घालावा आणि साखर घालून एका भांड्यात काढून घ्यावा. मिश्रण विस्तवावर ठेवून आटवून घ्यावे आणि कडेने सुटू लागल्यावर भांडे उतरवून मिश्रण घोटत राहावे. मिश्रण किती घट्ट झाले आहे ते बघून मोदक साच्यात टाकून मोदक बनवावेत. वरून चांदीचा वर्ख लावून सजवावेत... चिकू मोदक

वाचने 5321 वाचनखूण प्रतिक्रिया 10

चिंतामणी 22/09/2010 - 11:41
एक वेगळी पाकृ. सध्या मिपाकरांची चंगळ चालू आहे. पण खायला बोलवत नाही कुणी. बोलावले तर अजून छान वाटेल.

गणेशा 24/09/2010 - 17:08
आज पासुन पाककृती पाहण्यास सुरुवात केली. पहिलेच मोदकाचा मेनु म्हणजे मस्त वाटले. छान आणि वेगळा प्रकार कळाला. कधी ऐकण्यात नव्हता हो .. -- कसा लागतो ते पण सांगा ना .. जरा वेगळा पदार्थ आहे म्हणुन म्हणालो