Skip to main content

शशक'२०२२ - ब्रेकअप

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 23/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी वेळेवर सुटली. तू मात्र उशीरा आलास. किती वेळ हाताने तुला खुणावले. तूला सहज चढता आले असते. पण तू मागे फिरलास. नाही चढलास. निर्दयी. किती स्वप्ने पाहिली होती तुझ्याबरोबर. किती मनसुबे आखले होते. आतुरतेने तुझी वाट पाहात होते. सर्वावर तू पाणी सारलेस. तुला फरक पडला नसेल. कदाचित कळलेही नसेल तुला तू काय केलेस ते. मी कशी एवढी चुकले? का मी तुझ्यावर विश्वास ठेवला? कोणत्या तोंडाने घरी जाऊ? त्यांना काय सांगू? आता फक्त आठवणी. पुन्हा तुझी न माझी भेट होईलच. मुळीच जवळ येऊ नकोस. क्षमा देखील मागू नकोस. तुझा माझा संबंध सुटला. मी राहेन तुझ्याविना, तुझ्या चहा व खमंग भजीपाव विना.

वाचने 8987
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

Lol

+१

+१

आवडली

+१

+१ आवडली