गाडी वेळेवर सुटली. तू मात्र उशीरा आलास.
किती वेळ हाताने तुला खुणावले. तूला सहज चढता आले असते.
पण तू मागे फिरलास. नाही चढलास. निर्दयी.
किती स्वप्ने पाहिली होती तुझ्याबरोबर. किती मनसुबे आखले होते.
आतुरतेने तुझी वाट पाहात होते. सर्वावर तू पाणी सारलेस.
तुला फरक पडला नसेल. कदाचित कळलेही नसेल तुला तू काय केलेस ते.
मी कशी एवढी चुकले? का मी तुझ्यावर विश्वास ठेवला? कोणत्या तोंडाने घरी जाऊ? त्यांना काय सांगू?
आता फक्त आठवणी.
पुन्हा तुझी न माझी भेट होईलच. मुळीच जवळ येऊ नकोस. क्षमा देखील मागू नकोस.
तुझा माझा संबंध सुटला.
मी राहेन तुझ्याविना, तुझ्या चहा व खमंग भजीपाव विना.
वाचने
9031
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ मस्त, खुसखुशीत, आवल्डी!
+१
मस्त, खुसखुशीत, आवल्डी!
+1111
Lol
+१
+१
+१
+१
+१
आवडली
पुलंच्या पौष्टीक जीवन मधले एक
पुलंच्या पौष्टीक जीवन मधले एक वाक्य आठवले
" आणि म्हणूनच म्हणते , शेखर मला विसरून जा"
ते वाक्य म्हणजे " ए वा क "
In reply to पुलंच्या पौष्टीक जीवन मधले एक by विजुभाऊ
ते वाक्य म्हणजे " ए वा क " आहे.
शशक पेक्षाही जोरदार
नाही कळली. यशोदाबेननी लिहिली
नाही कळली. यशोदाबेननी लिहिली आहे काय?
+१
+१
+१
+१
आवडली
+१ . दिवाडकर स्टॉल आठवला .
+१ . दिवाडकर स्टॉल आठवला .