Skip to main content

शशक'२०२२ - आभास

Published on शुक्रवार, 20/05/2022
"हॅलो केबी५६." "हाय सीसी९९." "काय करतोयस?" "बिंज वॉचिंग! आभास चॅनेलचा रिआलिटी शो...पृथ्वी. तिसरा सीझन. जुरासिक. डायनॉसोरवाला! भन्नाट आहे यार. येतोस?" "नको, अरे.. " "वाटलंच. बस तू दिवसभर बातम्या बघत." "केबी५६, अरे आभास चॅनेल.. " "सीसी९९, आभास चॅनेल मात्र ग्रेट हां. थेट इथून हे शोज तयार केले इतक्या लांबच्या पृथ्वीवर. अरे, चौथ्या सीझनमधला गुहेतला नवीन प्राणी माणूस, पार अंतराळात पोहोचलाय." "अंतराळात!! म्हणजे आपल्या आरएन५००एक्सयू ग्रहावर पोहोचेल लवकरच. मग आपल्या रोबोस्तानचं काही खरं नाही!" "घाबरतोस काय? अरे 'आभासी' कार्यक्रम आहे हा. डायनोसॉरसारखाच हा माणूसप्राणी. काढतील पाचवा सीझन." "यार केबी५६..अरे, तेच तर सांगायला फोन केला होता. आजची ताजी बातमी... आभास चॅनेलचं दिवाळं वाजलंय."

याद्या 5139
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

+१

आधीच विज्ञान काल्पनिका = वाईट कथाप्रकार (अपवाद नारळीकर) शतशब्दकथा = महावाईट साहित्य प्रकार (अपवाद अजून शोधतोय) शशक विका = वरील दोघांचा गुणाकार. दोन ऋण संख्याचा गुणाकार धन संख्या होत असला तरी इथे तो नियम न आठवता दोन विषम संख्यांचा गुणाकार तिसरी विषम संख्या होतो हा नियम आठवावा.

+१

+१