शशक'२०२२ - आभास

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 May 2022 - 6:39 pm

"हॅलो केबी५६."

"हाय सीसी९९."

"काय करतोयस?"

"बिंज वॉचिंग! आभास चॅनेलचा रिआलिटी शो...पृथ्वी. तिसरा सीझन. जुरासिक. डायनॉसोरवाला! भन्नाट आहे यार. येतोस?"

"नको, अरे.. "

"वाटलंच. बस तू दिवसभर बातम्या बघत."

"केबी५६, अरे आभास चॅनेल.. "

"सीसी९९, आभास चॅनेल मात्र ग्रेट हां. थेट इथून हे शोज तयार केले इतक्या लांबच्या पृथ्वीवर. अरे, चौथ्या सीझनमधला गुहेतला नवीन प्राणी माणूस, पार अंतराळात पोहोचलाय."

"अंतराळात!! म्हणजे आपल्या आरएन५००एक्सयू ग्रहावर पोहोचेल लवकरच. मग आपल्या रोबोस्तानचं काही खरं नाही!"

"घाबरतोस काय? अरे 'आभासी' कार्यक्रम आहे हा. डायनोसॉरसारखाच हा माणूसप्राणी. काढतील पाचवा सीझन."

"यार केबी५६..अरे, तेच तर सांगायला फोन केला होता. आजची ताजी बातमी... आभास चॅनेलचं दिवाळं वाजलंय."

प्रतिक्रिया

एमी's picture

21 May 2022 - 8:11 pm | एमी

+१

भागो's picture

21 May 2022 - 9:02 pm | भागो

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:36 pm | चेतन सुभाष गुगळे

आधीच विज्ञान काल्पनिका = वाईट कथाप्रकार (अपवाद नारळीकर)
शतशब्दकथा = महावाईट साहित्य प्रकार (अपवाद अजून शोधतोय)
शशक विका = वरील दोघांचा गुणाकार. दोन ऋण संख्याचा गुणाकार धन संख्या होत असला तरी इथे तो नियम न आठवता दोन विषम संख्यांचा गुणाकार तिसरी विषम संख्या होतो हा नियम आठवावा.

सौंदाळा's picture

25 May 2022 - 8:19 pm | सौंदाळा

+१

वामन देशमुख's picture

25 May 2022 - 8:49 pm | वामन देशमुख

+१