मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - अफेअर

साहित्य संपादक · · स्पर्धा
तिला पहायला तो आला होता तेव्हा ती मनातून जरा घाबरली होती. खरं तर तो तिला खूप आवडला होता. पण पूर्ण वेळ तो थंडपणे दुसरीकडेच पहात होता. शेवटी त्याचा होकार आल्यानंतर तिला जरा आश्चर्य वाटलं. साखरपुडा झाल्यावर दोघे रोज भेटायला लागले. अजूनही तो गप्पगप्प असायचा. लग्न जवळ आले तेव्हा ती अधिकाधिक निरूत्साही होत गेली. त्याला कसे सांगावे, त्यावर तो काय म्हणेल याचा तिला अंदाजच येत नव्हता. एक दिवस ती धीर करून त्याला म्हणाली "तुला एक सांगायचंय. कॉलेजात असताना माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं." हे ऐकल्यावर तो हसून म्हणाला "एवढंच ना. अगं कॉलेजमध्ये असताना माझं सुद्धा एका मुलाबरोबर अफेअर होतं."

वाचने 11111 वाचनखूण प्रतिक्रिया 21

तुषार काळभोर 15/05/2022 - 11:53
शेवटच्या वाक्यात ट्विस्ट अपेक्षित होता. पण डोक्यात साचेबद्ध ट्विस्ट होता. हे तर ट्विस्टला पण ट्विस्ट केलंय !! :D :D :D

डाम्बिस बोका 15/05/2022 - 16:45
+१

Bhakti 15/05/2022 - 18:49
एवढंच ना.. हे हे ;)

प्राची अश्विनी 15/05/2022 - 20:13
+1

लोथार मथायस 16/05/2022 - 03:43
+१

चांदणे संदीप 16/05/2022 - 07:34
+१ सं - दी - प

चौथा कोनाडा 16/05/2022 - 11:53
+१ बा बो, आता कसं व्हायचं तिचं ?

स्वलिखित 16/05/2022 - 11:53
+1

टीकोजीराव 16/05/2022 - 14:46
;) ;)

नगरी 18/05/2022 - 15:03
बाबो, भलताच ट्विस्ट