Skip to main content
लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 19/05/2020 14:55 या दिवशी प्रकाशित केले.

भुंगा




शांत बसलेलो असतो तेव्हा कोठून तरी विचारांचा भुंगा डोक्यात शिरतो मेंदू पोखरतो दाबून टाकलेल्या जुनाट कुजक्या आठवणींचा भुसा बाहेर पाडत राहतो हुसकून लावावा म्हणता खोलवर आत जात राहतो मन बेचैन करतो चित्त हरपतो घटकाभर कसलीच मात्रा चालत नाही हताश करून सोडतो कोठून तरी भुंगा डोक्यात शिरतो


वाचने 6465
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अशा भुंग्याला पकडून कवितेत आणला आणी आमच्या मागे सोडला हे बरे नाही केले तुम्ही. ;) सं - दी - प