भुंगा

शांत बसलेलो असतो तेव्हा
कोठून तरी विचारांचा भुंगा डोक्यात शिरतो
मेंदू पोखरतो
दाबून टाकलेल्या जुनाट
कुजक्या आठवणींचा
भुसा बाहेर पाडत राहतो
हुसकून लावावा म्हणता
खोलवर आत जात राहतो
मन बेचैन करतो
चित्त हरपतो
घटकाभर कसलीच मात्रा चालत नाही
हताश करून सोडतो
कोठून तरी भुंगा डोक्यात शिरतो

वाचने
6439
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
होत अस कधी कधी!
.
अजून थोडे लिहायचे की
भुंगा बाहेर काढायचा राहिलाच
+१
छान प्रकटन.