......फूल/ पिस्तूल ठेविले.

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले
अंतरधर्मी नाते अपुले, मान्यच नव्हते दुनियेला या
जगलो आपण कसेतरी पण नाव मुला मकबूल ठेविले
कुणी चहाडी केली अपुली, कसे समजले आईला हे?
कोण विचारी, समोर तेव्हा तुझे बिलोरी डूल ठेविले
भीक देईना कुणीही जेव्हा झोळीमध्ये तिच्या अभागी,
पाझर फुटण्या लोकदयेला शेजारी मग मूल ठेविले
नाव पाहूनी मिळती लाईक, अर्थ जरी का कळला नाही.
ओळखून ही रीत जगाची तखल्लुस "सोकूल" ठेवले.
(मतला उधार घेतला आहे, त्याचा शायर माहित नाही.)

वाचने
5764
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
लव्ह जिहाद!!!
भारी!
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to भारी! by मन्या ऽ
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
.
एक दोन शेर चांगले जमलेत
झालीय आपली चर्चा मागेच येते,