Skip to main content

[कविता' २०२०] - ......फूल/ पिस्तूल ठेविले.

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 15/05/2020 17:16 या दिवशी प्रकाशित केले.

......फूल/ पिस्तूल ठेविले.




विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले अंतरधर्मी नाते अपुले, मान्यच नव्हते दुनियेला या जगलो आपण कसेतरी पण नाव मुला मकबूल ठेविले कुणी चहाडी केली अपुली, कसे समजले आईला हे? कोण विचारी, समोर तेव्हा तुझे बिलोरी डूल ठेविले भीक देईना कुणीही जेव्हा झोळीमध्ये तिच्या अभागी, पाझर फुटण्या लोकदयेला शेजारी मग मूल ठेविले नाव पाहूनी मिळती लाईक, अर्थ जरी का कळला नाही. ओळखून ही रीत जगाची तखल्लुस "सोकूल" ठेवले. (मतला उधार घेतला आहे, त्याचा शायर माहित नाही.)


वाचने 5769
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by मन्या ऽ

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


हा शेर तेव्हाही आवडला नव्हता आणि आताही आवडला नाहीच. शिवाय, तो शेर तसाच्या तसा उचलून नवी गजल लिहिण्याचा प्रयत्नही नाही आवडला. पोपट कवितेची गोष्ट वेगळी होती. तिथे निव्वळ विनोदनिर्मितीसाठी तो शेर वापरलेला म्हणून तिथे तो खपून गेला. इथे नाही. सं - दी - प

झालीय आपली चर्चा मागेच येते, आता बोलण्याला काय अर्थ आहे? परंतु आठवण रहावी कायमची म्हणून येथे प्रतिसाद लिहून आहे ठेविले