रेंगाळतो आहे...

आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकिंग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे...

वाचने
6662
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
क्षणभर नजर टाक बाहेर
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to क्षणभर नजर टाक बाहेर by गणेशा
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+1
मजा नाही आली
सत्यपरिस्थितीला "वा!" तरी कसे
In reply to मजा नाही आली by चांदणे संदीप
कविता आवडली
सर्व प्रतिसादकांना मनापासुन