Skip to main content

[कविता' २०२०] - रेंगाळतो आहे...

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

रेंगाळतो आहे...




आजतोवर वाचलास तु हा एक योगायोग आहे एक नजर टाक बाहेर तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे काही केल्या संपत नाहीत डोळे उघडुन बघ जरासे गरजुंची आज दैना आहे एक नजर टाक बाहेर तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे अपेयासाठी रांगा लावुनी काय तु कमावतो आहेस? आज तु वाचलास परि तु उद्याचे बुकिंग करुन ठेवतो आहेस जीवाचा आटापिटा करत तुझ्याच हितासाठी देव स्वतः झुंजतो आहे तरीही क्षुल्लक कारणे देऊन तु रस्ते धुंडाळतो आहेस क्षणभर नजर टाक बाहेर तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे...


वाचने 6662
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

भावना पोचल्या. आजूबाजूला हेच बघून उद्विग्न होतो कधी कधी.

क्षणभर नजर टाक बाहेर तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे... भारी लिहिले आहे, परिस्थीती उत्तम सांगितली आहे..

In reply to by गणेशा

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे काही केल्या संपत नाहीत डोळे उघडुन बघ जरासे गरजुंची आज दैना आहे एक नजर टाक बाहेर तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

वा! असे म्हणायला कवितेत वावच नाही. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

सत्यपरिस्थितीला "वा!" तरी कसे काय म्हणणार? असो.. पुढच्यावेळी आणखी चांगले लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! :)