Skip to main content

[शशक' २०२०] - दुवा मे याद रखना, बस!

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 24/04/2020 15:49 या दिवशी प्रकाशित केले.

दुवा मे याद रखना, बस!




"बघा ना काही होतंय का ते..." "काय बघणार साहेब?...तुम्हाला माहितचे" "नाही... पssण.." "कसंय साहेब, आमच्या हातात काही नसतं. रेकॉर्डनुसार जायला लागतं. प्रोशिजर असते साहेब." "पण एवढा मोठा माणूस, बायका पोरं, घरदार..सामाजिक कार्य..." "आम्ही चेक करूनच हात लावतो साहेब. ह्याच रेकॉर्ड दाखवू? ४ बायका, ८ पोरं, गडगंज श्रीमंतय वडील गेलेत, आय जिंदा आहे. १० दिसांपासून आजारी आहे... पन आमच्या वहीत अजूनपर्यंत येक्काची बी नोंद नाय जो हा जगावा म्हणून दुवा मागतोय. अगदी ह्याच्या आयची पण नाही!!" "ठीके..." सायबांनी सुस्कारा सोडला. नेहमीप्रमाणे त्यानं आपल्या दप्तरातून फास काढला आणि पेशंटच्या गळ्याला लावला. दहा मिनिटात टीव्ही वर बातमी अमुक देशाच्या ढमुक हुकुमशाहाचे निधन.


वाचने 3504
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

चांगली आहे कथा, अजुन ही जास्त छान बनवता आली असती, जर हुकुमशहा आजारी पडण्या अगोदरचे त्याचे काही प्रसंग दाखवता आले असते तर +१

आवडली

+ 1

+१

पेशंटला डायरेक्ट फाशी का दिली ब्रे ?

+1

+१ आवडली