माल

दर रविवार रात्री साडे नऊला गडद काचेची गाडी समोरच्या घरासमोर यायची.
घरातून एक तरुण बाहेर यायचा आणि गाडीचा दरवाजा उघडून कसलेसे पुडके घ्यायचा.
शिंदेबाईंना काही चैन पडेना.
"अहो! बघा जरा. आपलया डोळयांसमोर काय धंदे चाललेत समोरच्या घरात ते.
ड्रगचा माल पुरवतायत आठवड्याचा.
पोलिसात तक्रार करा म्हणते आत्ताच्याआत्ता.”
दुसऱ्या दिवशी सकाळी शिंदेबाईच्या दारावर थाप पडली.
बाहेर समोरचा तरुण होता. हातात रात्रीचे पुडके होते.
"माफ करा हं. मी समोर राहतो भाडेकरू म्हणून. मेडिकल कॉलेजात फायनलला आहे.
माझा फ्रिज पहाटे बिघडला.
एक दिवसापुरते तुमच्या फ्रिजमधे हे पुडके ठेवता आले तर आपले खूप उपकार होतील माझ्यावर.
आई काल रात्री माझं आठवड्याचं जेवण देऊन गेली."

वाचने
5065
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय पन नही अन नाही पन नाही ...
+१
+1
+१
+१
+1
गडद काचेची गाडी पण जेवण देणार
लोल
In reply to गडद काचेची गाडी पण जेवण देणार by गणेशा
मी पण..
In reply to लोल by चांदणे संदीप
मला पण हिच शंका आली. आई एकतर
In reply to गडद काचेची गाडी पण जेवण देणार by गणेशा
हो ना
In reply to मला पण हिच शंका आली. आई एकतर by मनिम्याऊ
Corona ग्रस्तांच्या
In reply to हो ना by संजय क्षीरसागर
पुडक्यात काय होते ते कोणास माहित.
In reply to गडद काचेची गाडी पण जेवण देणार by गणेशा
तरुणावर विश्वास ठेवलात ना! का?
+1