Skip to main content

[शशक' २०२०] - माल

लेखक चहाबाज यांनी गुरुवार, 23/04/2020 19:09 या दिवशी प्रकाशित केले.

माल




दर रविवार रात्री साडे नऊला गडद काचेची गाडी समोरच्या घरासमोर यायची. घरातून एक तरुण बाहेर यायचा आणि गाडीचा दरवाजा उघडून कसलेसे पुडके घ्यायचा. शिंदेबाईंना काही चैन पडेना. "अहो! बघा जरा. आपलया डोळयांसमोर काय धंदे चाललेत समोरच्या घरात ते. ड्रगचा माल पुरवतायत आठवड्याचा. पोलिसात तक्रार करा म्हणते आत्ताच्याआत्ता.” दुसऱ्या दिवशी सकाळी शिंदेबाईच्या दारावर थाप पडली. बाहेर समोरचा तरुण होता. हातात रात्रीचे पुडके होते. "माफ करा हं. मी समोर राहतो भाडेकरू म्हणून. मेडिकल कॉलेजात फायनलला आहे. माझा फ्रिज पहाटे बिघडला. एक दिवसापुरते तुमच्या फ्रिजमधे हे पुडके ठेवता आले तर आपले खूप उपकार होतील माझ्यावर. आई काल रात्री माझं आठवड्याचं जेवण देऊन गेली."


वाचने 5078
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

गडद काचेची गाडी पण जेवण देणार पुडक्या मध्ये ? आणि ते ही आठवड्याचे ..आणि ते पण आई.. का असे काही कळाले नाही ...

In reply to by गणेशा

मला पण हिच शंका आली. आई एकतर व्यवस्थित डब्बा देईल आणि अस पटाकन निघून नाही जाणार. नाहितर मुलगा घरी जाईल जेवायला. पुडके मे कुछ काला है boss

In reply to by मनिम्याऊ

घरची गाडी वगैरे असेल तर इतका उद्योग करण्यापेक्षा सरळ बाईपण ठेवता येईल ...... स्वयंपाकाला.